साहित्य – एक वाटी मैदा, तीन चमचे तेल, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, चवीपुरते मीठ, अर्धी वाटी दूध, तळण्यासाठी तेल. एक वाटी साखर (पाकासाठी)
कृति – एका बाऊलमध्ये मैदा, चवीनुसार मीठ, तेल गरम करून घालावे. मिश्रण एकत्रित करून दुधात मळावे. 15 मिनिट भिजत ठेवावे. हे पीठ भिजेपर्यंत एका भांड्यात एक वाटी साखर, एक वाटी पाणी घ्या. एकतारी पाक बनवा. आता त्या पिठाचे लहान 5 एकसारखे गोळे तयार करून त्याच्या पातळ पोळ्या लाटाव्यात. प्रथम एक पोळी घ्यावी त्याच्यावर अर्धा चमचा तूप सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर सगळीकडे पसरवावे. अश्याप्रकरे हीच कृती पाचही पोळ्यांवर करून त्या पोळ्या एकावर एक ठेऊन त्या पोळ्या एकत्र धरून त्याचा घट्ट रोल बनवा. रोलच्या शेवटी पाण्याची दोन बोटे लावा म्हणजे रोल घट्ट बसेल आणि तळताना तेलात पदर सुटणार नाहीत. बनवलेल्या रोलचे सुरीने अर्ध्या इंचाचे तुकडे करावेत. हे तुकडे जसे कापले आहेत तसेच ठेवून हलक्या हाताने थोडेसे लाटून घ्यावेत. मंद गॅसवर तळावे. खाजा थंड झाल्यावर पाकात बुडवून लगेच काढावा. गुलाबजाम सारखे पाकात मुरात ठेवायची गरज नाही.