दैनिक पंचांग – बुधवार दि. 7 एप्रिल 2021

पापमोचनी एकादशी, 1942 शार्वरी नामसंवत्सर फाल्गुन कृष्णपक्ष, धनिष्ठा 27।33 सूर्योदय 06 वा. 29 मि. सूर्यास्त 06 वा. 32 मि.

राशिभविष्य

मेष      –  आपल्या स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा कटू शब्दांचा उपयोग आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात. बर्‍याच दिवसांपासून राहिलेली खरेदी होईल.

वृषभ    –  आज आपणास आपल्या विचारांबरोबर एकटे राहून आपले दैनंदिन कार्यक्रम थांबविणे आवश्यक आहे. मागील उधारी व उसनवारी वसूल होईल.

मिथुन    – आज वादांमुळे आपणास निष्कारण ताण असल्याचा अनुभव येईल. कौटुंबिक पाठिंबा देखील मिळणार नाही. मित्र व नातेवाईकांचा सहवास लाभेल.

कर्क      –  वाहने अधिक काळजीपूर्वक चालवा. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. घराच्या बांधकामाचा प्लॅन आज तयार करा.

सिंह     –  आर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न आपणास यश मिळवून देतील. आपणास वरिष्ठ अधिकार्‍यांकडून समर्थन मिळेल.

कन्या    –  कला क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. आपणास नवे वाहन मिळण्याची शक्यता आहे. मानसन्मानात वाढ होईल. काहींना स्पर्धात्मक यश मिळेल.

तूळ      – आज आपणास कठोर श्रम करावे लागेल. काही निष्कारण चिंतांमुळे आपली व्यग्रता वाढेल. वाहने व उपकरणे जपून वापरावीत.

वृश्चिक  – आपला जोडीदार आपणास भावनात्मक पाठबळ देईल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट आपल्यासाठी आनंदाची ठरेल.

धनु     –  धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल.

मकर    – मित्रांमध्ये होणारे वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील. मानसिक स्थिती आल्हाददायक राहील. संततीसौख्य लाभेल.

कुंभ     –  वरिष्ठांबरोबर संपर्कात आल्याने प्रसन्न वातावरण राहील. नवीन संधी मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. नवीन वाहन खरेदीचे योग आहेत.

मीन     –   व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयां मध्ये पैसा खर्च होईल. इतर लोकांना आपल्या इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा