साहित्य – 50 ग्रॅम ताज्या गुलाबांच्या पाकळ्या, 2 लिटर दूध, 1 कप साखर.
कृति – एका जाड बुडाच्या भांड्यात दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या घेऊन उकळत ठेवा. जेव्हा दूध घट्ट होऊन निम्मं होईल तेव्हा गॅस कमी करून सतत ढवळत राहा जेणेकरून ते भांड्याच्या तळाशी लागणार नाही. आता यामध्ये 1 कप साखर मिसळून विरघळेपर्यंत उकळत ठेवा. यानंतर दूध गॅसवरून उतरवून खाली ठेवा. अधिक थंड होण्यासाठी थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा. मग सर्व्ह करण्यापूर्वी यामध्ये काही गुलाबाच्या पाकळ्या टाकून थंडथंड सर्व्ह करा.