थांबला तो संपला

एक छोटसं गाव होतं. गावाच्या आसपास सृष्टीसौंदर्य भरपूर होतं. गावाशेजारीच लागून भलामोठा डोंगर होता. गावातला एक गावकरी आज कितीतरी वर्षे त्या डोंगराला पाहात होता. त्या डोंगरावर जायची त्याची खूप इच्छा होती. पण कधी वेळच मिळाला नव्हता. म्हणून त्याने मनाशी ठरवले की उद्या डोंगरावर जायचेच. डोंगरावर जायला चार पाच तास लागणार होते. दुपारपर्यंत परत येण्यासाठी पहाटेच जावे लागणार होते. उद्या पहाटे लवकर डोंगर चढायला लागायचं हे ठरवून तो झोपायला गेला, पण काही केल्या त्याला झोप येईना. शेवटी रात्री तीन वाजता तो उठला, कंदील हातात घेतला आणि तो घराबाहेर पडला. गावाबाहेर आल्यावर त्याच्या लक्षात आल की आसपास सर्वत्र अंधारच आहे.. कंदीलाच्या एवढ्याशा प्रकाशात डोंगर कसा चढायचा हा विचार करीत तो एका झाडाखाली बसून सकाळ व्हायची वाट पाहू लागला, पहाटे पहाटे एक साथू तेथे आला. त्याला अस बसलेलं पाहून साधूने त्याची अडचण विचारली. त्याने अंधाराचे कारण सांगताच साथू म्हणाला. तुम्ही चालणं सुरुच ठेवाहोतं. कंदीलाच्या प्रकाशात जसं जसे पुढे जाल तसा तसा रस्ता दिसला असता. आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या ईप्सित जागी म्हणजे डोंगरावर पोहोचला असतात. पावलापुरता प्रकाश मिळाला तरी सर्व जग पालथं घालता येतं.

तात्पर्य  – एखादे इप्सित गाठायचे असल्यास सतत पुढचा मार्ग धरावा. त्यासाठी कशाची वाट पाहात थांबू नये. थांबला तो संपला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा