जपा सकारात्मक दृष्टीकोन

लमित्रांनो, एखाद्या पार्टीला, गेल्यावर खायला प्यायला काय आहे, हे तुम्ही बघताच. पण मजा, मस्ती करणार्‍या व्यक्तीकडे सर्वात आधी लक्ष जातं. कोपर्‍यात कोणी लांब चेहरा करून बसलं असेल तर त्याला नावं ठेवली जातात. सतत हसतमुख असणार्‍या, प्रत्येक क्षण एंजॉय करणारे सकारात्मक विचारांचे असतात. रडका चेहरा करून बसलेले लोक नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह विचारांचे असतात. एखाद्या ठिकाणी गेल्यावर तिथलं वातावरण, खाणं पिणं एंजॉय करण्यापेक्षा पैसे वाया गेल्याचं दु:ख करत बसतात. असे लोक कुणालाही आवडत नाहीत. त्यामुळे प्रत्येकानेच सकारात्मक विचार ठेवायला हवेत. 1] सकारात्मक विचारांमुळे तुम्हाला नवा आत्मविश्‍वास मिळतो. 2] कालचा पेपर वाईट गेला म्हणून रडत बसण्यापेक्षा पुढचा पेपर कसा जाईल, याचा विचार करायला हवा. तुम्ही कालच्याच पेपरचा विचार केलात तर पुढचा पेपरही वाईटच जाईल. त्यामुळे परीक्षेला जाताना कायम पॉझिटिव्ह विचार ठेवा. यामुळे तुमचा त्या दिवसाचा पेपरच नाही तर संपूर्ण परीक्षा चांगली जाईल. 3] प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येतातच. कधी एखादा पेपर चांगला जातो तर एखादा अवघड जातो. तसंच आयुष्याचं असतं. पण प्रसंग कोणताही आला तरी रडत बसण्यात काहीच अर्थ नसतो. जे झालं ते विसरून पुन्हा पुढे जाता आलं पाहिजे. यालाच पॉझिटिव्ह ऍटीट्यूड म्हणतात. 4] एखाद्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी भांडण झाल्यावर तुम्ही एखाद्या दिवशी त्याच्याशी बोलत नाही. पण, पुन्हा तुमची मैत्री सुरू होते. भांडण एखादाच दिवस टिकतं. सकारात्मक विचारांमुळेच तुम्ही पुन्हा मैत्री करता. मित्राशी बोलायला लागता. 5] हाच पॉझिटिव्ह ऍटीट्यूड कायम ठेवा. यामुळे आयुष्यात प्रत्येक वेळी पुढे जाल. कधीही मागे वळून पहावं लागणार नाही. 6] चेहरा कायम हसरा ठेवा. हसत राहिलात की मनात निगेटिव्ह विचार येणारच नाहीत. परीक्षा असो वा होमवर्क किंवा दुसरं काही… कधीच टेन्शन घेऊ नका. आयुष्यातला प्रत्येक्ष क्षण मस्त एंजॉय करा. बघा रोजचा तुमचा दिवस किती आनंद देऊन जातो ते…

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा