ऑइली स्किनची काळजी क शी घ्याल् ?

त्वचा ऑइली असल्यास क्लिंझिंगला पर्याय नाही. क्लिंझिंगमुळे त्वचेवर साठलेली घाण, मेकअप, मृत त्वचा नाहीशी होऊन रंध्रे मोकळी होतात. या उपायाने ब्लॅकहेड्सची समस्या दूर होते. आठवड्यातून एकदा लाइट स्क्रब केल्याने फायदा होतो.1] ऑइली फ्री फेसवॉश नियमित वापरल्यास त्वचा ऑइली फ्री राहते. ग्लिसरीनयुक्त साबणाचा वापर करू नका. 2] तांदळाच्या पिठीमध्ये पुदिन्याचा अर्क किंवा गुलाबजल मिसळून चेहऱ्यावर दहा मिनिटे हा पॅक ठेवावा. दहा मिनिटांनंतर हलक्या हाताने चोळून पॅक काढून टाकावा.3] पर्समध्ये नेहमी गुलाब अथवा लॅव्हेंडर बेस असलेलं स्किन टॉनिक ठेवा. त्याबरोबर वेट टिश्यूजही हवेत. दर दोन तासांनी याने चेहरा स्वच्छ केल्यास त्वचा टवटवीत राहते.4]ऑइली स्किनवर अँकनेचा त्रास होत असेल, तर टी ट्री अँटी पिंपल जेल अथवा जेल मॉईश्चरायझर वापरणं चांगलं.5] त्वचेचं सीबमऑइल नियंत्रणात ठेवण्यासाठी तेलकट आणि मसालेदार पदार्थ वर्ज्य केलेले चांगले. तैलीय ग्रंथीमध्ये संतुलन राखण्यासाठी फायबरयुक्त भोजन उपयुक्त आहे. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात एकेक डिश सलाड असणं अत्यावश्यक आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा