रत्नागिरीच्या डोंगरात वसलेले प्रसिद्ध मंदिर राजमहेंद्री आणि वैझाग विमानतळापासून फक्त ८० किलोमीटर अंतरावर असणाºया सत्यनारायण मंदिराची ही माहिती.
सत्यनारायण मंदिर हे देशातील काही पवित्र ठिकाणांपैकी एक समजले जाते. आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात अन्नावरम इथे हे मंदिर वसलेले असून, ते सर्वत्र पूजल्या जाणाºया भगवान सत्यनारायणाचे मंदिर आहे. दररोज हजारो भक्तगण या पवित्र ठिकाणी येऊन सत्यनारायणाची पूजा करतात आणि देवाचे आशीर्वाद घेतात. दररोज सकाळी सहा ते संध्याकाळी सहादरम्यान इथे पूजा केली जाते. सणासुदीच्या काळात सत्यनारायणाची पूजा रात्रीपर्यंत चालते. मंदिरात प्रशस्त सभागृह असून, एका वेळेस हजारो लोकांना तिथे सत्यनारायणाची पूजा करता येते.
मंदिरातर्फे राहण्याची आणि खाण्यापिण्याची उत्तम सुविधाही केली जाते. गव्हाच्या पिठापासून तयार केला जाणारा सत्यनारायण प्रसाद अतिशय रुचकर असतो आणि सर्वांना आवडतो. पर्यटकांना मंदिर प्रशासनातर्फे चालवली जाणारी गोशाळा (पवित्र गाईचे स्थान), वेद पाठशाला, आयुर्वेद पाठशाळा आदी ठिकाणेही पाहता येतात.
भगवान सत्यनारायण मंदिराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे ठिकाण, जे विशाखापट्टणम विमानतळापासून जवळ असून, हे शहर भारतातील सर्व प्रमुख शहरांशी हवाई, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीने जोडले गेलेले आहे. राजामहेंद्री हे पर्यटकांनी नावाजलेले आंध्र प्रदेशमधील आणखी एक ठिकाण असून, तिथे बॅकवॉटर्स, पामच्या झावळ्यांनी नटलेले दिडीचे कालवे, गोदावरी नदी जिथे बंगालच्या खाडीला मिळते, तिथल्या पपिकोंडालू ते अंतरवेदी मार्गावरील हाऊसबोट्स अशा विविध गोष्टी पर्यटकांना अनुभवायला मिळतात. गोदावरी नदीसाठी दररोज केली जाणारी हराती प्रथा ही पाहण्यासारखी असते.