पंजाबी ढाबा स्टाइल दाल माखनी

साहित्य  –  अर्धा कप उडीद डाळ, अर्धा कप राजमा, पाव कप चणाडाळ, एक टोमॅटो चिरलेला, एक कांदा चिरलेला, दोन टी स्पून लोणी, अर्धा टी स्पून गरम मसाला, चवीपुरते लाल तिखट, मीठ.

कृती      – सर्वप्रथम उडीद डाळ, राजमा, चणाडाळ धुवून घ्यावी. डाळी, राजमा, आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो, मीठ, लाल तिखट घालून कूकरला शिजवून घ्यावी. कढईत लोणी गरम करून त्यात चिरलेला कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यावा. त्यात टोमॅटोची पेस्ट घालून पुन्हा परता म्हणजे त्यातील तेल वेगळे होईल. त्यात हिंग आणि गरम मसाला घालून मिनिटभर परतावेत. शिजलेल्या डाळी घालून पुन्हा मंद आचेवर ठेवावे. वाढण्यापूर्वी वरून बटर घालावे आणि सर्व्ह करावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा