पुरावे दिल्यावरच करसवलत

ज्या नोकरदार मंडळींनी प्राप्तीकरात सवलत मिळवण्यासाठी आर्थिक वर्षाच्या सुरवातीला गुंतवणुकीचे डिक्लेरेशन दिले असेल, त्यांना आता लेखा विभागात त्यासंबंधीचे पुरावे सादर करावे लागतील. यासाठीची शेवटची तारीख आता जवळ आली आहे. जर आपण वेळेत काम पूर्ण न केल्यास आपल्याला संस्थेकडून मार्च महिन्यांत वेतनातून प्राप्तीकर एकरकमी कापला जावू शकतो.

नोकरदार मंडळींना प्राप्तीकरात सवलतीचा लाभण्यासाठी केवळ गुंतवणूक करणे पुरेसे नाही तर संपूर्ण आर्थिक वर्षात केलेली गुंतवणुकीचा लेखाजोखा कंपनीच्या लेखा विभागाला सादर करणे गरजेचे आहे. त्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. अशावेळी ज्या मंडळींनी प्राप्तीकरात सवलत मळवण्यासाठी वर्षाच्या सुरवातीला प्रस्तावित गुंतवणुकीचे जे विवरण सादर केले होते, त्याच्या सत्यप्रती द्याव्या लागतील. आपण अजूनही गुंतवणुकीचे पुरावे सादर केले नसतील तर वेळेत जमा करा. अन्यथा, प्राप्तीकर आपल्या वेतनातून एक रक्कमी कापला जावू शकतो. त्यानंतर आपल्याला रिफंडसाठी बराच आटापिटा करावा लागेल.

तरतुदी काय आहेत?

प्राप्तीकर कलम 80 सी नुसार आपण दीड लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर करकपातीचा लाभ घेऊ शकता. या गुंतवणुकीत इपीएफमधील गुंतवणूक, जीवन विमा पॉलिसी, पीपीएङ्ग, एनएससी, पाच वर्षासाठीची मुदत ठेव, गृहकर्जावरील मुळ रक्कमेतील भरणा आणि दोन मुलांच्या ट्यूशन ङ्गीचा समावेश करण्यात आहे. या आर्थिक वर्षात आपण ज्या पर्यांयावर गुंतवणूक केली आहे, त्याच्या सर्व पावत्या गोळा करा. दीड ज्या नोकरदार मंडळींनी प्राप्तीकरात सवलत मिळवण्यासाठी आर्थिक वर्षाच्या सुरवातीला गुंतवणुकीचे डिक्लेरेशन दिले असेल, त्यांना आता लेखा विभागात त्यासंबंधीचे पुरावे सादर करावे लागतील. यासाठीची शेवटची तारीख आता जवळ आली आहे. जर आपण वेळेत काम पूर्ण न केल्यास आपल्याला संस्थेकडून मार्च महिन्यांत वेतनातून प्राप्तीकर एकरकमी कापला जावू शकतो. लाखांपर्यतच्या करसवलतीचा लाभ घेण्यासाठी सर्वात अगोदर ट्यूशनफीस, गृहकर्जात भरलेली मूळ रक्कम, पीपीएफच्या गुंतवणुकीचे आकलन करावे. त्यानंतर गरज भासल्यास 80 सी नुसार गुंतवणूक करावी.लक्षात ठेवा 80 सी मध्ये केवळ दीड लाखांपर्यंतच करसवलत मिळते. त्याउपरही आपली गुंतवणूक होत असेल तर त्याचा लाभ मिळणार नाही.

भाडे पावती – नोकरदार मंडळी घराच्या भाड्यावर दिल्या जाणार्‍या रकमेवर करकपातीचा लाभ घेऊ शकतात. करसवलतीची मर्यादा ही आपल्या एचआरए आणि आपण कोणत्या शहरात राहतात, यावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे घरभाड्यावर मिळणारी सवलत ही 80 सी च्या मर्यादेपेक्षा वेगळी असते. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला भाडे पावती जोडावी लागणार आहे. यावर एक रुपयाचा रजिस्ट्री स्टँप लावावा लागेल. त्यावर घरमालकाच्या सह्या असणे गरजेचे आहे. जर घरमालकाचे भाडे वार्षिक एक लाखापेक्षा अधिक असेल तर त्या स्थितीत घरमालकाचे पॅनकार्ड देणे आवश्यक आहे. आपण जेवढे भाडे देतो, ते संपूर्ण करसवलतीला पात्र असेलच असे नाही. याबाबत काही संभ्रम असेल तर लेखाविभागाकडून माहिती मिळवू शकता.

आणखी काही पर्याय

प्राप्तीकर 80 सीशिवाय आपल्याला करकपातीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यानुसार गृहकर्जाच्या हप्त्यात भरण्यात येणार्‍या व्याजापोटीच्या रक्कमेवर देखील करकपातीचा दावा करता येतो. यावर 24 बी नुसार दोन लाखांपर्यंतच्या व्याज भरण्यावर कर सवलतीची तरतूद आहे. आरोग्य विम्यावर 25 हजारापर्यंतच्या हप्त्यावर 80 डी नुसार करसवलत मिळवू शकतो. जर आपण आई वडिलांनासाठी आरोग्य विमा घेत असाल तर 25 हजारापर्यंत अतिरक्ति करसवलतीचा लाभ घेऊ शकता. आईवडिल ज्येष्ठ असतील तर त्यांच्यासाठी 30 हजार रुपयाची गुंतवणूक करुन आणखी लाभ घेऊ शकता. यानुसार 80 डीनुसार 55 हजार रुपयांपर्यंत करसवलतीचा लाभ घेऊ शकता. आपण एनपीएसमध्ये गुंतवणूक करत असाल तर त्यावरही वेगळ्या करकपातीचा लाभ घेऊ शकता.

गुंतवणुकीचे बंधन नाही

करकपातीसाठी आपण वर्षाच्या सुरवातीला दिलेल्या डिक्लरेशनप्रमाणे गुंतवणूक करावी असे बंधनकारक नाही. जर आपण आर्थिक वर्षाच्या सुरवातीला पीपीएङ्गमध्ये 40 हजार रुपयाची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले असेल आणि आपण 20 हजाराचीच गुंतवणूक केली असेल तर उर्वरित रक्कम पीपीएफमध्यच गुंतवावी, असे बंधनकारक नाही. आपण एनएससीमधील गुंतवणूक दाखवू शकता. एकुणात 80 सी नुसार दीड लाखांपर्यंत गुंतवणूक करण्यावर सवलत मिळू शकते. जर कर सवलतीसाठी आपण गुंतवणूक केली असेल आणि वेळेत त्याचे पुरावे दाखल करु शकला नाही तर त्यावरही फारशी काळजी करण्याचे कारण नाही. अशा स्थितीत लेखा विभाग या गुंतवणुकीवर करसवलत देणार नाही, परंतु आयटीआर दाखल केल्यानंतर रिफंड मिळवू शकता. प्राप्तीकर विभाचे डिजिटायजेशन झाल्याने बहुतांश प्रकरणाचा निपटारा हा दोन आठवड्यात होतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा