‘डाउनपेमेंट’ ची जुळवाजुळाव करताना….

आपल्या मनाप्रमाणे घर खरेदी करण्याची इच्छा सर्वंच जण बाळगून असतात. मागच्या पिढीने एक एक पैसा जोडून घर उभा केले तर नव्या शतकातील तरुण मंडळी गृहकर्जाच्या मदतीने घराचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहकर्ज घेताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे डाउनपेमेंट. आपण काही प्रमाणात डाउनपेमेंट करतो, तेव्हाच बँका आपल्याला घर खरेदीसाठी मदत करतात. महानगराचा विचार केल्यास 40 लाख ते 1 कोटींपर्यंत वन बीएचके फ्लॅटची रक्कम झाली आहे. यासाठी डाऊनपेमेंट हे दहा ते वीस लाखांपर्यंतचे केले जाते. एवढी मोठ्या रक्कमेची जुळवाजुळव करणे हे उंच पर्वत चढण्याइतके कठिण आहे.

पुण्यातील एक कुटुंब कैवल्य कुलकर्णी आणि केतकी हल्लूर यांचे उदाहरण पाहू या. कैवल्य (वय 33) हा एका औषधी कंपनीत शास्त्रज्ञ आहे आणि केतकी (वय 28) ही कंस्ट्रक्शन केमिकल कंपनीत सिव्हिल इंजिनिअर आहे. या दोघांनी अडीच वर्षांपूर्वी घर खरेदीचा निर्णय घेतला. या दोघांनी भांडवल जमा करण्याची सुरवात अगदी शून्याने केली. दोघेही वाहन कर्जाचा हप्ता अगोदरपासूनच भरत होते. अशावेळी गृहकर्ज मिळणे जरा कठिण होते. अशावेळी दोघांनी एसआयपीच्या माध्यमातून काही भांडवल उभा करण्याचा निर्णय घेतला. अडीच वर्षात जमा झालेल्या रक्कमेचा वापर त्यांनी घराच्या डाउनपेमेंटसाठी करण्याचा निर्णय घेतला. बँकेकडून वाजवी दराने कर्जाची ऑफर होती. परंतु त्यांच्या हिशोबाने जमलेले भांडवल पुरेसे नव्हते. तेव्हा त्यांनी नॉन बँक फायनान्स कंपनीची निवड केली. ही कंपनी जादा व्याजदराने मनाप्रमाणे कर्ज देण्यात तयार होती. केवळ घराची किंमत अधिक असणे हे घर खरेदीत अडथळा ठरु शकत नाही, ही बाब अधोरेखित होते. नव्या पिढीतील बहुतांश मंडळी ही कर्जरुपातूनच वस्तू खरेदी करण्याच्या आहारी गेलेली आहेत. कर्जाची रक्कम ते हप्त्याच्या स्वरुपात भरतात. मात्र सुरवातीच्या काळात काही रक्कम भरल्यावरच गृहकर्ज सुरू होते आणि हीच मोठी अडचण आहे. आर्थिक सल्लागाराच्या मते, डाउनपेमेंटची व्यवस्था करणे खूपच सहज आहे. परंतु यासाठी काही ध्येय निश्‍चित करायला हवे.

हिशोब योग्य ठेवणे एकतर आपण घर खरेदी करायचे आहे, हे ठरवले पाहिजे. दुसरे म्हणजे त्याची किंमत. जर आपण वनबीएचके खरेदी करु इच्छित असाल तर त्याची किंमत 50 लाख रुपये आहे आणि अडीच वर्षानंतर खरेदी करायची असेल तर त्याला किंमतीला सध्याचा महागाईचा दर जोडायला हवे. त्यानंतरच आपण डाउनपेमेंटचा हिशोब करायला हवा. 50 लाखांच्या घराची किंमत ही अडीच वर्षानंतर पाच टक्के दराने 55.12 लाख रुपये होईल. याचाच अर्थ आपल्याला 20 टक्के दराने डानपेमेंट 11.02 लाख रुपये भरावे लागतील. डाउनपेमेंटचा हिशोब करताना आपल्याला महागाईचा दर देखील लक्षात घ्यावा लागेल. मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्काचे देखील आकलन करणे महत्त्वाचे आहे.

सर्वसाधारण नियमांप्रमाणे आपल्या महिन्याला मिळणार्‍या वेतनाच्या प्रमाणात हप्ता हा 40 टक्केपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. सर्व आर्थिक सल्लागार हेच सांगतात. यासाठी एक उदाहरण पाहू. जर आपण 50 लाख रुपयाच्या घरासाठी 40 लाख रुपयांचे कर्ज 9.25 टक्के व्याजदराने 20 वर्षांसाठी घेत असाल तर हप्ता 36,635 रुपये होईल. अशावेळी आपले मासिक वेतन 90 हजार रुपये असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला आर्थिक चणचण भासणार नाही. आपण जेवढे कमी कर्ज घ्याल, तेवढ्याच प्रमाणात त्याची परतङ्गेड करणे सोयीचे जावू शकते. जर आपल्या उत्पन्नात अडचणी असतील तर सुरवातीला आणखी काही आर्थिक ध्येय निश्‍चित करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण घराचा विचार बदलला पाहिजे. जर आपण घरालाच प्राधान्य देत असाल तर उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे किंवा अन्य आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी केली जाणारी तरतूद कमी करावी लागेल. गुंतवणूक कोठे करावी?

जर घर खरेदीसाठी आपण डाउनमेंट जमा करण्याचा निर्णय करत असाल तर आपल्याला किती रक्कम जमा करायची आहे, हे अगोदर ठरवावे लागेल. आपल्याकडे सध्या किती पैसा आहे आणि रिस्क प्रोङ्गाइल किती आहे, हे पाहणे गरजेचे आहे. आपल्याकडे पाच वर्षाचा कालावधी आहे तर ती रक्कम इक्विटी म्युच्युअल फंड किंवा ऍग्रेसिव्ह हायब्रिड ङ्गंडमध्ये गुंतवणे ङ्गायद्याचे ठरु शकते. जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर मुदत ठेवी, रिकरिंग डिपॉझिट किंवा बॉंड ङ्गंडचा विचार करायला हवा. कमी कालावधीसाठी म्युच्युअल ङ्गंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करु नये. बाजारात मंदीचे वातावरण आल्यास किंवा चढउतार होऊ लागला तर अपेक्षेपेक्षा कमीच मूल्य हाती पडू शकते. त्यामुळे कमी कालावधीसाठी बाजाराची निवड केल्यास अडचण येऊ शकते. आपल्याकडे वेळ असेल तर किमान पाच वर्षापेक्षा अधिक काळासाठी मल्टीकॅप किंवा लार्ज कॅप इक्विटी ङ्गंडमध्ये पैसा टाकावा. कमी काळासाठी स्मॉल कॅप इक्विटीमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करु नये. कारण त्यात परतावा चांगला मिळतो, परंतु जोखीमही तितकीच असते. आपला उद्देश पैसा कमावण्याचा नसून डाउनपेमेंटचा असेल तर आपण पैसा वाढवण्यापेक्षा बचत करण्यावर भर द्यायला हवा. आपण निश्‍चित केलेल्या ध्येयाजवळ पोचतो तेव्हा आपण इक्विटी ङ्गंडऐवजी कमी जोखमीच्या योजनेचा पर्याय निवडला पाहिजे. जर आपल्याकडे पाच वर्षाचा कालावधी असेल आणि इक्विटी ङ्गंडमध्ये 12 टक्क्याने परतावा मिळत असेल तर आपल्याला दरमहा 24659 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ज्या कुटुंबात पती-पत्नी दोघेही कमावते असेल तर चांगल्या आर्थिक नियोजनातून डाउनपेमेंटची व्यवस्था करणे अवघड नाही.

वैयक्तिक कर्जाचा विचार चांगला नाही

काही लोकांकडे संयमाचा अभाव असतो. कारण काही मंडळी डाउनमेंपेमेंटसाठी वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करतात. अर्थात सर्वच आर्थिक सल्लागार पर्सनल लोन घेऊ नका, असे सांगत नाहीत, मात्र ते घेण्यापूर्वी आपला आर्थिक ताळेबंद पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

आपण मागच्या काळात कोणतेही आर्थिक ध्येय निश्‍चित न करता अशा ठिकाणी गुंतवणूक करता की तेथून फारसा परतावा मिळत नाही. त्यामुळे अशा गुंतवणुकीचा विचार करायला पाहिजे. विशेषत: वारशाने मिळालेल्या गुंतवणुकीचा जे की आपले आर्थिक ध्येय साध्य करत नाहीत, त्याचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. उदा. आपण मुदत ठेवी मोडू शकता. त्यावर कर आकारल्यानंतर आपल्याला सहा टक्के परतावा मिळेल. जर आपण जादा हप्त्याची पॉलिसी घेतली असेल आणि त्यात सम ऍश्यूर्ड रक्कम अधिक नसेल आणि त्याचा लॉकइन पीरियड संपला असेल तर अशी पॉलिसी सरेंडर करणे ङ्गायद्याचे ठरु शकते.

या आधारावर आपल्या हाती काही प्रमाणात पैसा राहू शकतो. जर आपण वैयक्तिक कर्ज घेत असाल तर आपल्याला जादा पैसा भरावा लागेल. पर्सनल लोनपासून आपण दूर राहणे गरजेचे आहे. अर्थात सर्वांकडे एकसारखा वेळ नसतो. एखादा चांगला व्यवहार असेल आणि तेव्हा एकरक्कमी पैसे नसतील तर अशावेळी मित्र, नातेवाईकांकडून मदत घेऊन घराचा विचार पूर्ण करु शकता. आपण संयमाने जीवन जगत असाल तर कमी कालावधीसाठी पर्सनल लोन घेऊ शकता. बहुतांश मंडळी डाउनमेंपेटसाठी पैशाची जुळवाजुळव करण्यावर भर देतात. परंतु घर खरेदीच्या प्रक्रियेत हा पहिलाच टप्पा आहे, याकडे दुर्लक्ष करतात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा