कोरोनाच्या अर्थझळा

कोरोना संसर्गाचा फटका सर्व भारतीयांनी बसला आहे. मोठ्या प्रमाणात लोकांचा कर्जाचा बोझा वाढला आहे. आरबीआयच्या ताज्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत भारतीय घरांवरील कर्ज जीडीपीच्या 37.1 टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. त्याच वेळी, कुटुंबाची बचत 10.04 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. कोरोनामुळे लाखो लोक बेरोजगार झाले आहेत, तर मोठ्या संख्येने पगाराची कपात झाली आहे. यामुळे लोकांना अधिक कर्ज घ्यावं लागलं आहे किंवा त्यांनी हे खर्च त्यांच्या बचतीतून पूर्ण केले आहेत, असं आरबीआयने म्हटलं आहे. आकडेवारीनुसार, एकूण कर्जबाजारामध्ये कुटुंबाचा वाटा वार्षिक आधारावर 1.30टक्क्यांनी वाढून 51.5 टक्के झाला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा