कासवांची त्सुनामी

निसर्गाची किमया न्यास नरी, पुरूदीच्या किनारी सर्गाची किमया न्यारी, पुरूस नदीच्या किनारी सर्गाची किमया न्यारी, पुरूस नदीच्या किनारी अवतरली कासवांची स्वारी… अवतरली कासवांची स्वारी

शेजारील छायाचित्रातलं दृश्य ब्राझीलमधल्या पुरूस नदीच्या किनार्‍यावरचं. इथे चिमुकली कासवं अवतरली आणि निसर्गप्रेमींच्या आनंदाला उधाण आलं. पुरूस नदीकाठी 92 हजारांपेक्षाही अधिक कासवांचा जन्म झाला. म्हणूनच याला कासवांची ‘त्सुनामी’ म्हटलं गेलं. ही कासवं साधीसुधी नव्हती. ती होती ‘साउथ अमेरिकन रिव्हर टर्टल’ या दुर्मीळ प्रजातीच्या कासवांची पिल्लं. मोठ्या प्रमाणावर होणार्‍या तस्करीमुळे ही प्रजाती लुप्त होत चालली आहे. म्हणूनच या कासवांच्या संवर्धनाचे प्रयत्न होत आहेत. अंड्यांमधून बाहेर पडलेली ही कासवं नदीच्या दिशेने धाव घेतात. निसर्गाचा हा चमत्कार डोळ्यांत साठवण्यासारखाच असतो. पुरूस नदीकिनारी कासवांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जन्म होणं ही सध्याच्या नकारात्मक वातावरणातली सकारात्मक बाब म्हटली पाहिजे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा