10 सेकंदात पडली 144 माजली इमारत

संयुक्त अरब अमिरातमधील ‘अबुधाबी’ या शहराला गगनचुंबी इमारतींसाठी ओळखले जाते. येथील इमारतींची उंची ऐकून प्रत्येकाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. अशा या शहरातील तब्बल 144 मजली इमारत अवघ्या 10 सेकंदांत पाडण्यात आली. यासाठी 915 किलो स्फोटके वापरण्यात आली. उल्लेखनीय बाब म्हणजे अत्यंत कमी वेळेत 144 मजली इमारत पाडल्याच्या या विक्रमाची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’मध्ये करण्यात आली आहे.

मीना प्लाझा ही इमारत पाडल्यासंबंधीचा एक व्हिडीओ ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या अधिकृत पेजवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, 144 मजली इमारत पाडण्याबाबत तज्ज्ञांच्या कमिटीमध्ये दीर्घकाळ चर्चा झाली. या बैठकीत यासंबंधीची ब्ल्यू प्रिंट तयार केली. इमारतीमध्ये सुमारे 18 हजार ड्रील व्होल पाडून त्यामध्ये 915 किलो इतकी स्फोटके भरण्यात आली. पूर्ण तयारी झाल्यानंतर इमारतीमध्ये स्फोट घडवून आणण्यात आला. त्यानंतर मीना प्लाझा नामक ही 144 मजली इमारत अवघ्या 10 सेकंदांत जमीनदोस्त झाली. तत्पूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून आसपासचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला होता.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा