महिला मराठा उद्योजक लॉबीचा हळदी कुंकु कार्यक्रम उत्साहात, रोपे वाटून दिला पर्यावरणाचा संदेश

अहमदनगर- मराठा उद्योजक लॉबी ही मराठ्यांनी मराठ्यांसाठी चालविलेली व्यावसायिक चळवळ आहे. 2019 मध्ये लॉबीच्या वर्धापन दिनाचा भव्य राज्यस्तरीय मेळावा नगरमध्ये झाला होता. गेल्या महिन्यात नगरची महिलांची स्वतंत्र कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. लॉबीचे मराठवाडा संपर्क प्रमुख राजेंद्र औताडे व लॉबीचे मार्गदर्शक आणि मराठी सोयरीक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुटे यांनी महिला टीमपुढे नगरमध्ये व्यावसायीक विचारांनी हळदी कुंकू घ्यावे अशी संकल्पना मांडली. त्यानंतर लगेच महिला मराठा उद्योजक लॉबीच्या जिल्हाध्यक्षा जयश्री चोभे, सरचिटणीस मीरा बारस्कर, संपर्कप्रमुख स्मिता इथापे, सह संपर्कप्रमुख रविना पिंगळे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सदस्या जयश्री अशोक कुटे, यशस्वी उद्योजिका हिराताई औटी, दिपाली संदीप खरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम नगरमध्ये घेण्यात आला. हा कार्यक्रम 22 जानेवारी रोजी नगर शहरात जय भवानी नगरमध्ये मोठया उत्साहात पार पडला. यावेळी पहिलालाच कार्यक्रम असूनही 50 महिलांची उस्फुर्त उपस्थिती होती. यावेळी वाण म्हणून सर्वांना रोपे वाटून पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच यावेळी लॉबीचे मार्गदर्शक अशोक कुटे व प्रयास फाउंडेशनचे प्रमोद झावरे यांनी महिलांनी व्यवसायात उतरावे, व्यवसायाचे महत्त्व पटवून दिले. यशस्वी महिला उद्योजिका हिराताई औटी, मिरा बारस्कर, जयाताई चोभे, जयश्री अशोक कुटे यांनी महिलांना व्यावसायीक मार्गदर्शन केले. लॉबीची ब्रॅण्ड म्बेसिडर सौम्या संदीप खरमाळे हिची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाबद्दल संस्थापक विनोद बढे, राज्य कार्यकारिणीतील चेतन देवरे, स्वप्नील काळे, राहुल बारावकर, राजेंद्र औताडे, संदीप खरमाळे, महेश आठरे, संतोष कुटे, सुरज गट यांनी अभिनंदन केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा