कलाकाराचं क्षितीज – क्षितीज रेषा

कलाकाराची नजर एका क्षितीज रेषेवर खिळलेली असते. या रेषेवर एक तारा असतो. या तार्‍याचं प्रातिनिधीक रूप म्हणजेच कलेतला त्या कलाकाराचा आदर्श. या आदर्शापर्यंत पोहोचणं हेच त्याच्या जीवनाचं ध्येय! हा आदर्श तारा हासिल करण्यासाठीच सच्चा कलाकार तन, मन प्राणपणाला लावून आयुष्यभर झिजतो. कष्ट घेतो. शेकडो जन्मांची तपश्चर्या करीत या क्षितीज रेषेकडे सरकत राहतो आणि.. क्षितीज हाती लागत नाही. तार्‍यांची जागा सापडते पण ताराही पुढे सरकलेला… ! या तार्‍याचीही नजर दूरवर कुठेतरी स्थिरावलेली त्याच्या नजरेसमोरही त्याच्यापुरती दिसणारी एक क्षितीज रेषा असते. तिथेही एक नेत्रदीपक तारा लखलखत असतो आणिती जागा मिळत नाही म्हणून आपला तारा असमाधानी असतो. दुःखी कष्टी, उदास असतो. प्रत्येक कलाकाराचं क्षितीज असं त्याच्या दृष्टीपथात.. हाती मात्र येत नाही..

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा