उड्डाणपुलाच्या कामात आडकाठी आणल्यास कठोर कारवाई करणार-खा.डॉ. सुजय विखे यांचा इशारा; कामाची पाहणी करत विद्युत वाहिनी, जलवाहिनी स्थलांतराचा घेतला आढावा

अहमदनगर- शहरातील उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून, भूसंपादनाची राहिलेली प्रक्रिया या महिनाअखेर पूर्ण करण्यात येईल. उड्डाणपुलाच्या कामास नागरिक सहकार्य करतील ही अपेक्षा आहे, परंतु जे कोणी कामात अडथळा निर्माण करतील, वाद घालतील त्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर प्रशासनामार्फत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा खा.डॉ. सुजय विखे पा. यांनी दिला आहे. शहरातील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी तसेच यासंदर्भात विद्युत वाहिनी आणि जलवाहिनीचे स्थलांतर करण्याबाबत खा. सुजय विखे व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सोमवारी (दि. 18) सकाळी सक्कर चौक ते स्टेट बँक चौकापर्यंत पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

यावेळी नगरसेवक योगीराज गाडे, निखिल वारे, प्रशांत दारकुंडे, निर्मल मुथ्था, मनपा उपायुक्त प्रदीप पठारे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आर. जी. सातपुते, अतिक्रमणविरोधी पथकाचे सुरेश इथापे, श्री. मेहेत्रे, श्री. रोहकले, राहुल गिते, महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री. उल्ले, बांधकाम विभागाचे श्री. गायकवाड, अतिक्रमण विभागाचे रिजवान शेख, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दिग्विजय पाटणकर, श्रीकांत लोखंडे, मुनीर सय्यद, वाहतूक पोलिस निरीक्षक श्री. देवरे, नगररचना कार्यालयाचे अधिकारी वैभव जोशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना खा. विखे म्हणाले की, उड्डाणपुलाच्या सुरुवातीच्या ठिकाणी काही अडचणी आहेत. एका ठिकाणी मंदिर आहे तर एका ठिकाणी वॉलकंपाऊंड आहे. या अडचणीचा आढावा घेण्यात आला आहे.

नागरिक या कामास सहकार्य करतील आणि ज्या ठिकाणी सहकार्य होणार नाही, वाद होतील अशा ठिकाणी जिल्हाधिकारी, पोलिस, प्रशासनामार्फत संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यावर मी आणि शहराचे आ. संग्राम जगताप आमचे दोघांचेही सहमत आहे. माझाही कोणी माणूस असणार नाही आणि त्यांचाही कोणी माणूस यात असणार नाही. या कामात कोणताही पक्ष नाही. सर्व पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाच्या निर्मितीत आडकाठी आणणार्‍या कोणालाही आमचे अथवा पक्षाचे पाठबळ मिळणार नाही. याच दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असल्याचे खा. विखे यांनी स्पष्ट केले. नगर शहरातील उड्डाणपुलाच्या संदर्भातील 99 टक्के जागा हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केले गेली असून लवकरच या उड्डाणपुलाच्या कामात येणारे अतिक्रण, पथदिवे, विद्युतीकरणाचे खांब तसेच जलवाहिनीच्या स्थलांतर काम पूर्ण करण्याचे निर्दे श यावेळी दिले. नगर शहराच्या विकासाकामांमध्ये राजकारण न करता सर्वपक्षीय सहकार्याने शहराचे विविध विकासकामे पूर्ण करुन असेही त्यांनी सांगितले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा