विस्कळीत होणार्‍या पाणी पुरवठ्याबाबत महापालिकेने योग्य नियोजन करावे -शिवराष्ट्र सेनेचे संतोष नवसुपे यांची मागणी

अहमदनगर – अहमदनगर शहरला पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी दि.19 ते 30 जानेवारी दरम्यान शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले आहे. परंतु या कालावधीत नागरिकांची पाण्यासाठी परवड होऊ नये यासाठी मनपाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवराष्ट्र सेनेच्यावतीने निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी शिवराष्ट्र सेनेचे पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, दलित आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल शेकटकर, शहर जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, ज्येष्ठ पदाधिकारी भैरवनाथ खंडागळे, युवा प्रमुख शंभुराजे नवसुपे आदि उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम दि.19 ते 30 जानेवारी दरम्यान करण्यात येणार आहे. या कामामुळे शहरासह उपनगरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. या विस्कळीत होणार्‍या कालावधीत पाणी पुरवठ्याबाबत मनपाने उपाययोजना करुन नागरिकांना पाणी व्यवस्था केली आहे का? अन्यथा गोंधळाची स्थिती निर्माण होईल. शहरातील विहिरी, पाण्याचे साठे प्रशासनाने ताब्यात घ्यावे, जेणेकरुन नागरिकांना यातून पाणी पुरवठा करण्यात येईल. तसेच मनपाच्यावतीने विभागनिहाय टँकर व स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी व कामगारांचे फोन नंबर जाहीर करावे, जेणे करुन नागरिकांना पाणी उपलब्ध करुन देणे सोयीचे होईल. त्याच प्रमाणे मनपा हद्दीतील टँकर चालकांची बैठक घेऊन त्यांना याबाबत सूचना द्याव्यात, आपत्कालीन परिस्थितीत टँकर ताब्यात घ्यावेत. तसेच पाणी टँकरचे दर निश्चित करुन ते जाहीर करावेत. जेणे करुन नागरिकांना पाणी मिळेल व जादा दराचा फटकाही बसणार नाही. याबाबत तातडीने बैठक घेऊन उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा