पुण्यात तुळशीबागसमोर स्टॉल्ससाठी नगरच्या व्यावसायिक व उद्योजकांना संधी

अहमदनगर- पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या तुळशीबागेच्या अगदी समोर नगरी उद्योजक, व्यावसायिकांना पुण्यात आपला व्यवसाय, स्वतःची उत्पादनांची सेवा सुरू करण्यासाठी 50 स्टॉल्स् मिळू शकणार आहेत, अशी माहिती आयोजक प्रीत जैन यांनी दिली. या स्टॉल्स्चे वैशिष्ट्य म्हणजे सर्व सुविधांयुक्त असून लाईटशिवाय, इन्व्हर्टरची सोय आहे. अतिशय कमी खर्चात, कमी भांडवलात स्वतःचा स्टॉल घेता येईल. पुण्याच्या तुलनेत केवळ 15 हजारांपासून 40 हजारांपर्यंत भाडे आणि तितक्याच अनामत रकमेत बुकिंग करता येईल. मागील वर्ष कोरोना, मंदी, नैराश्य सगळं विसरून नव्या वर्षात, नवा व्यवसाय वाढविण्याची संधी आहे. न्यू तुळशीबाग बाजार, विश्रामबागवाडा व मळचंद शेजारी, बाजीराव रोड, पुणे या स्टॉल्सच्या बुकींगसाठी 7709005585, 9860300400 या मोबाईलवर संपर्क साधावा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा