चायना मांजाच्या विक्रीबरोबरच वापर करणारांवरही होणार कारवाई -शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांचा इशारा

अहमदनगर- पक्षी, प्राण्यांसह नागरिकांच्या जिवालाही धोकादायक ठरणार्‍या चिनी आणि नायलॉन मांजाच्या विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. मात्र तरीही अशा जीवघेण्या मांजाची छुपी विक्री, वापर आणि साठवणूक केली जात असल्याने आता चायना मांजा विक्री करणार्‍याबरोबरच या मांजाचा वापर करताना कुणी आढळल्यास त्याच्यावरही तातडीने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी दिली.

सक्रांतीच्या काळात पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. या धोकादायक मांजामुळे या कालावधीत अनेक पक्षी, प्राणी जखमी होतात, तर काही मृत्युमुखी पडतात. त्यामुळे राज्य सरकारने 1986च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम 5 नुसार या मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. तरीही या मांजाची विक्री आणि वापर सर्रास सुरू असतो. अशा विक्रेत्यांवर आणि मांजा वापरणार्‍या पतंगप्रेमींवर पोलिसांची बारीक नजर असेल. नायलॉन किंवा चिनी मांजा वापरताना अगर विक्री करताना कुणी आढळल्यास बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल होईल. हा जामीनपात्र गुन्हा असला, तरी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एक महिना कारावास किंवा दंड तसेच दोन्ही शिक्षा होऊ शकतात. या मांजामुळे कुणी जखमी झाल्यास भारतीय दंड विधानच्या इतर कलमांनुसारही कारवाई केली जाऊ शकते, असे पोलिसांनी म्हटले आह

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा