ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाच्या नूतनीकरणाच्या कामाची महापौरांकडून पाहणी

अहमदनगर- ऐतिहासिक वस्तु संग्रहालयाच्या नूतनीकरणाच्या कामाची वस्तु संग्रहालयाचे कार्याध्यक्ष तथा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी वस्तु संग्रहालयाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, भाजपा मंडल अध्यक्ष अजय चितळे, भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख पुष्कर कुलकर्णी, अंबादास पंगुडवाले, राहुल रोहोकले आदी उपस्थित होते. यावेळी महापौर वाकळे म्हणाले की, ऐतिहासिक वस्तु संग्रहालय नुतनीकरणाचे काम सुरू आहे.

या वस्तुसंग्रहालयात फार पूर्वीच्या काळामधील अत्यंत दुर्मिळ अशा वस्तू पाहावयास ठेवण्यात आलेल्या आहेत. ऐतिहासिक वस्तुचे अत्यंत चांगल्या प्रकारे जतन करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी जिल्हयातून, राज्यातून व देशभरातून पर्यटक येत असतात. आजच्या नविन पिढीला ऐतिहासिक वस्तुची माहिती या निमित्ताने होत आहे. ऐतिहासिक वस्तु संग्रहालयात असलेल्या वस्तु व त्याची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या दृष्टिने या ऐतिहासिक वस्तु संग्रहालयाचे नुतनीकरणाचे काम अत्याधुनिक पध्दतीने करण्यात येत आहे.

नुतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ऐतिहासिक वस्तु संग्रहालय नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक संग्रहालयामुळे नगर शहराच्या नांव लौकिकात भर पडणार आहे. तरी नागरिकांनी विशेषत: तरूण वर्गांनी या ऐतिहासिक वस्तु संग्रहालयास भेट द्यावी व पूर्वीच्या काळातील ऐतिहासिक वस्तु पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा