नगर महापालिकेच्या आयुक्तपदी विकासाचे व्हिजन असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी नेमावेत

अहमदनगर- महापालिका स्थापन होऊन 18 वर्षे होऊनही नगर शहर हे एक मोठे खेडेच राहिले आहे. त्यामुळे अहमदनगर शहरासाठी विकासाचे व्हिजन असणारे एक कर्तव्यदक्ष अधिकारी आयुक्त पदावर नियुक्त करावेत अशी मागणी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती संजय गाडे यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली आहे.

अहमदनगर महानगरपालिकेची स्थापना होवून 18 वर्ष पूर्ण झालेले आहे. तेव्हापासून आजअखेर महानगरपालिकेला एकही कार्यक्षम आयुक्त मिळालेला नाही. ज्या अधिकार्‍यांची सेवानिवृत्ती एक किंवा दोन वर्ष राहिलेली आहे अशाच अधिकार्‍यांची महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती दिलेली आहे. हा आतापर्यतचा इतिहास आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे ते जबाबदारीने काम करत नाहीत आणि पर्यायाने नगर शहराचा कुठल्याही प्रकारचा सर्वागीण विकास झालेला नाही. तसेच विकासाच्या योजना व मोठे प्रकल्प अहमदनगरामध्ये येवू शकले नाहीत. अहमदनगर शहर हे मोठे खेडेच राहीलेले आहे. तेव्हा या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करुन अहमदनगर शहरासाठी विकासाचे व्हिजन असणारे एक कर्तव्यदक्ष अधिकारी आयुक्त म्हणून मिळावेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा