कायद्याचे पालन करत आपापल्या हक्कांसाठी सर्वांनी सजक असावे-मुख्य न्यायदंडाधिकारी पी.एस. चांदगुडे

अहमदनगर-स्वामी विवेकानंद हे तेजस्विता, तत्परता व तपस्विता याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करतांना युवकांमधील प्रचंड उर्जेच्या स्रोताला चांगल्या प्रकारे वळण देण्याचे काम होणे गरजेचे आहे. चांगल्या जीवनशैलीसाठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कायदे व नियमांच्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय, राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तत्पर आहे. धर्म व कायदा हे एकच आहेत. धर्माचे पालन म्हणजेच कायद्याचे पालन होय. कायद्याचे पालन करत आपापल्या हक्कांसाठी सर्वांनी सजक असावे. जनजागृतीसाठी झालेल्या या शिबिरातून युवकांना कायद्याचे चांगले ज्ञान मिळाले आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी पी.एस. चांदगुडे यांनी केले.

जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या वतीने सी.एस.आर.डी. समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कायदेविषयक जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थाना वरून मुख्य न्यायदंडाधिकारी पी.एस. चांदगुडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, शहर बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.भूषण बर्‍हाटे, सेन्ट्रल बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष काकडे, सी.एस.आर. डी. समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक डॉ.सुरेश पठारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविकात न्यायाधीश रेवती देशपांडे म्हणाल्या, तरुण म्हणजे प्रचंड उत्साह, काहीतरी करुन दाखवण्याची धडपड, तरुण म्हणजे प्रचंड जोश, अफाट इच्छाशक्ती. आजच्या तंत्रज्ञानात तरुणांची भरारी विलक्षणीय आहे. परंतू व्यसनाधीनता, चंगळवाद, सोशल मिडीयाचा अतिरेक वापर ही तरुण पीढीला लागलेली वाळवी आहे. म्हणूनच ‘उठा, जागेव्हा आणि ध्येयसिद्धी झाल्या शिवाय थांबू नका’ हा स्वामी विवेकानंदांनी दिलेला संदेश युवकांनी अंगिकारला पाहिजे.

राजमाता जिजाबाई यांचेही महान कार्य आज सर्वाना मार्गदर्शक आहे. युवकांना कायद्याचे चांगले ज्ञान असावे यासाठी जिल्हा विधिसेवा प्राधिकरण जनजागृतीचे उपक्रम राबवत आहे. जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी व्याख्यानात सार्वजनिक उपयोगीता सेवा आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजना बद्दल माहिती दिली. युवकांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक महत्वपूर्ण योजना आहेत. या योजनाचा लाभ युवकांनी घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी अ‍ॅड.भूषण बर्‍हाटे यांनी व्याख्यानातून दारिद्र्य निर्मुलन योजनांची प्रभावी अंमलबजावणी या विषयावर माहिती दिली. ते म्हणाले, जिल्हा विधिसेवा प्राधिकरण सर्वसामान्यांना न्याय व ज्ञान देण्याचे महत्वपूर्ण कार्य करत आहे. स्वामी विकेकानंद व राजमाता जीजाबाईंचा आदर्श घेवून जीवनात काम करावे असे आवाहन केले. अ‍ॅड. सुभाष काकडे यांनी व्याख्यानातून रस्ता सुरक्षतेबद्दल जागरूकता या विषयर युवकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, रस्तांवर होणार्‍या अपघाता मध्ये होणारे मृत्यूंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अपघात ग्रस्तांना मदत करणार्‍या मदतदूतास कोणताही त्रास होणार नाही यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कायद्यात मोठ्या तरतुदी केल्या आहेत. यावेळी डॉ.सुरेश पठारे यांनी समाज विकासात युवकांची भूमि का या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी विधिसेवा प्राधिकरणाचे सदस्य अ‍ॅड. शिवाजी कराळे, अ‍ॅड.अनुराधा येवले, अ‍ॅड. सुनील तोडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अ‍ॅड. अभय राजे यांनी केले. आभार जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे अधिक्षक राजकुमार मोरे यांनी मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा