महापालिका कर्मचार्‍यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर-आ. संग्राम जगताप यांनी घेतली ना.प्राजक्त तनपुरेंची भेट

अहमदनगर- महापालिकेच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावास नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली. महापालिका कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आ. जगताप यांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची कामगार युनियनच्या पदाधिकार्‍यांच्या समवेत भेट घेवून चर्चा केली. यावेळी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती मंत्री तनपुरे यांनी दिली असल्याचे आ. जगताप यांनी सांगितले. नगर महापालिकेतील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने अनेक दिवसांपासून राज्य शासनाकडे पाठपुरावा केला.

याबाबतच्या महापालिकेच्या प्रस्तावास नगरविकास विभागाने मान्यता दिली. दि.1 जानेवारी 2016 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा महापालिकेचा मार्ग यामुळे मोकळा झाला. नगर महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नवाढीच्या अटीला अधीन राहून कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. असे आ.जगताप म्हणाले. मनपात 11 अभियंत्यांची पदे भरण्यास अखेर मंजुरी महापालिकेत अभियंत्यांची पदे भरण्यास परवानगी नव्हती. त्याचा थेट परिणाम शहर विकासाच्या प्रकल्पांवर होत असून, महापालिकेत अभियंत्यांची 11 पदे नव्याने भरण्यास नगरविकास विभागाने परवानगी दिली असल्याची माहितीही आ. संग्राम जगताप यांनी दिली.

सन 2016 मध्ये महापालिकेच्या आकृतिबंधास मंजुरी मिळालेली आहे; परंतु तांत्रिक पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता. त्यामुळे अभियंत्यांची पदे भरली गेली नाहीत. अभियंत्यांची पदे रिक्त असल्याने शहर विकासाचे प्रकल्प राबिवताना अनेक अडचणी येत होत्या. महापालिकेत अभियंत्यांची 11 पदे भरण्याची परवानगी मिळावी, यासाठी आ. संग्राम जगताप यांनी नगरविकास खात्याकडे पाठपुरवा केला. नगरविकास राज्यमंत्री प्रजाक्त तनपुरे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान अभियंत्यांची पदे भरण्यास परवानगी देण्यात आली असून, तसा आदेशही जारी करण्यात आला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा