विवेकानंद यांचे जीवन चरित्र युवकांना प्रेरणा देणार-अ‍ॅड. आर. आर. पिल्ले यांचे प्रतिपादन

अहमदनगर- स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्र प्रत्येक युगात युवकांना प्रेरणा देणारे असून, त्यांचे विपुल साहित्याचे आजही जगभरातील अनेकांकडून वाचन होते. देशातील प्रत्येकाने हे साहित्य जाणून घेतले तर सुसंस्कृत समाज निर्माण होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन अ.नगर कॅन्टोंमेंट बोर्डाचे भुतपूर्व व्हाईस प्रेसिडेंट व भिंगार काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. आर. आर. पिल्ले यांनी केले. स्वामी विवेकानंद यांची 158 वी जयंती नगर शहर व भिंगार काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. पिल्ले बोलत होते. गुजर गल्लीतील (नगर) स्वामी विवेकानंद पुतळ्याला अ‍ॅड. पिल्ले व काँग्रेसचे नगर शहर अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले. स्वामीजींचे विपुल साहित्य म्हणजे भारताची उच्च दर्जाची विद्वता सिद्ध करते, असे भुजबळ यावेळी म्हणाले तर कवी विवेक येवले यांनी धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालून स्वामीजींनी जगभरात दिलेली व्याख्यानांचे अनेक खंड वाचनीय तर आहेच. शामराव वाघस्कर यांनी स्वामीजींचे साहित्य युगानंयुगे जगाला दिशा देणारे ठरणार आहे, असा दावा केला. पक्षाचे पदाधिकारी अभिजित कांबळे, विजय आहेर, रमेश कदम आदिंनी स्वामीजींचे विचार आणि आचरण ‘बोले तैसा चाले’ असे असल्याचे विविध पैलू सांगतांना स्पष्ट केले. गायक व कवी सुनिल महाजन यांनी युवा दिनाचे महत्व आपल्या गायनातून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजेश सटाणकर यांनी केले तर अ‍ॅड.नरेंद्र भिंगारदिवे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांसह पक्षाचे सदस्य, मित्र परिवार आदि उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा