आदर्श व्यक्तीमत्वांचे विचाराच समाजातील अनीती संपवू शकत-सुरेखा कदम

अहमदनगर- संत, महंत, विचारवंत, क्रांतिकारक यांनी मानव कल्याण आणि स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले, तर काहींनी प्राणपणास लावले. मानव कल्याणाचा विचार सार्‍या विश्वाला देत हिंदू संस्कृतीची जगाला नव्याने ओळख करु देत मानवी जीवनाला व युवा शक्तीला ऊर्जा प्राप्त करुन देण्याचे काम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांनी केले आहे. आज या थोर व्यक्तींचे विचार आणि कार्य कृतीतून दिसले पाहिजे.

समाजात स्त्रीयांवर वाढत चालले अत्याचार, विकृतीने युवा पिढी भरकटत चालली आहे. अशा परिस्थिती थोरांची शिकवण आणि विचार समाजात रुजविण्याची गरज आहे. माँ जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले तर विवेकानंदांनी युवा पिढीला ‘बंधू-भगिनी’च्या रुपाने विश्वाला प्रेरणा दिली. आज या व्यक्तीमत्वांचे विचाराच समाजातील अनिती संपवू शकते. त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सुरेखा कदम यांची केले. लायनेस क्लब ऑफ मि डटाऊन व शिवसेना यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षा सुरेखा कदम, माजी अध्यक्षा राजश्री मांढरे, सचिव शारदा होशिंग, नगरसेविका सुवर्णा गेनप्पा, सविता जोशी, सविता शिंदे, सुरेखा भोसले, अरुणा गोयल, कांता बोठे आदि उपस्थित होत्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा