राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

अहमदनगर- राजमाता जिजाऊंसाहेबांनी शिवनेरीच्या अंगाखांद्यावर लहानाचा मोठा करताना सह्याद्रीच्या कुशीत निर्भयपणे वावरायला शिकवताना शिवरायांना महाभारत व रामायणातील राम आणि कृष्णांच्या गोष्टीचे बोधामृत पाजताना स्वराज्य स्थापनेचे बाळकडू पाजले. ती मातृशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ 12 जानेवारी 1595 मध्ये विदर्भातील सिंदखेड राजा येथे त्यांचा जन्म झाला. हिंदवी स्वराज्याचे महान स्वप्न पाहणारे त्या जिजाऊ त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष सावेडी अजय चितळे, राहुल रोहोकल आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की स्वराज्याच्या स्थापनेसाठी जिजाऊ मॉसाहेबांनी जे योगदान दिले आहे. ते निश्चितच प्रेरणादायी आहे. एक तरूण तपस्वी म्हणून परदेशात भारतीय संस्कृतीचा वारसा पसरविणारे स्वामी विवेकानंद हे साहित्य तत्वज्ञान आणि इतिहासाचे प्रकांड, विद्वान होते. स्वामी विवेकानंद योग, राजयोग, ज्ञानयोग असे ग्रंथ तयार करून तरूण वर्गाला एक नविन मार्ग दिला आहे. त्याचा प्रवाह युगाने युगे सर्व सामान्यावर असेल लिहिले. स्वामी विवेकानंदानी अध्यात्मिक, धार्मिक ज्ञानाच्या बळावर आपल्या दूरदृष्टीद्वारे सर्व मानवी जगाला जीवन जगण्याची पध्दती शिकवली. ते नेहमी कर्मावर विश्वास ठेवणारे महान पुरूष होते. अशा या महान पुरूषाच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळयास महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. भाजपा मंडल अध्यक्ष सावेडी अजय चितळे, राहुल रोहोकले आदी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा