कापड बाजार व गुजरगल्ली येथील जैन मंदिराचा कर कायमस्वरुपी माफ

अहमदनगर- येथील श्री जैन ऋषभ संभवती संघाच्या कापड बाजार व गुजरगल्ली येथील दोन्ही जैन मंदिरास एकूण कराची मनपाकडून जादा रक्कम आलेली होती. त्यांनी ती नियमाप्रमाणे भरली परंतु याबाबत अधिक चौकशी केली असता धार्मिक स्थळांबाबतच्या नियमानुसार ही रक्कम जादा होती. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना याबाबत माहिती दिली असता, त्यांनी मनपाशी याबाबत पाठपुरावा करुन जादा आलेली रक्कम निदर्शनास आणून दिली. मनपाने याबाबत जादा आलेली रक्कम पुढील पाणीपट्टी व ड्रेनेज संकलित करात समायोजित करण्यात येईल, असे पत्र दिले.

मनपाकडून जादा आलेली रक्कम कमी करण्यासाठी पाठपुरावा करणारे बाळासाहेब बोराटे यांचा कापड बाजार जैन मंदिरच्यावतीने अध्यक्ष सुभाष मुथा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परेश लोखंडे, विशाल वालकर, ट्रस्टी मणिकांत भाटे, विनोदभाई शाह, दिनेशभाई गांधी, राजूभाई शाह, सीए राजूभाई शाह, डॉ. सागर पटवा, कमलेश गांधी, सागर शाह, उमेश गांधी, आकाश वखारीया, शेखर गांधी, बापूभाई गांधी, सुनिल पटवा, संदिप मुथा आदि उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्ष सुभाष मुथा म्हणाले, कापड बाजार जैन मंदिरात हे पुरातन जैन मंदिर असून, या ठिकाणी नित्यनियमाने दररोज धार्मिक कार्यक्रम होत असतात. दानशूरांनी दिलेल्या देणगीत मंदिराचे व्यवस्थापन चालत असते. मनपाने चुकीने व्यवसायिक कर लावल्याने जादा रक्कम आलेली होती. ती भरलीही परंतु याबाबत शंका आल्याने गेल्या वर्षभरापासून नगर शहरातील धार्मिक स्थळांच्या जादा संकलित कराबाबत बाळासाहेब बोराटे पुढाकार घेत असल्याने त्यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी मनपाकडे पाठपुरावा करुन दर जादा आलेली रक्कम कमी करण्यासाठी मोठे सहकार्य केले. त्यामुळे मंदिराचे पैसे वाचल्याने मंदिराच्या कार्यास एकप्रकारे हातभार लागणार आहे.

याप्रसंगी बाळासाहेब बोराटे म्हणाले, अहमदनगर महापालिका अस्तित्वात आल्यापासून महानगरपालिका अधिनियमांनुसार धार्मिक स्थळांना 132 ब 1 प्रमाणे संकलित कर संकलित कर, रस्ता कर, शिक्षण कर हे सर्व कर माफ करण्यात आलेले आहेत. त्यानुसार कापड बाजार जैन मंदिर तसेच गुजरगल्लीतील जैन मंदिर या मंदिरांदेखील नियम डावलून पट्टीची आकारणी होत होती. आम्ही त्याचा पाठपुरावा करुन पाणीपट्टी व ड्रेनेज टॅक्स सोडून बाकीचे सर्व कर माफ करुन घेण्यात यश आले आहे. या पुढील काळात मंदिराला पाणीपट्टी व ड्रेनेज आकारणी होईल, असे सांगितले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा