‘म्हाडा’च्या ‘यशश्री’च्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर, नूतनीकृत इमारतीचे उद्घाटन

अहमदनगर- म्हाडाने जानेवारी 2012मध्ये फ्लॅटधारकांना बिल्डिंग ताब्यात दिली. त्यानंतर प्रकाश मुथा यांच्या अध्यक्षतेखाली योगेश ताटी, प्रमोद त्रिभुवन, शंकर गाडेपल्ली, बेद्रे काका, मुनगंटी सर, मनीषा पिसे-भोसले, वैशाली कुरापाटी, मनोरमा आल्हाट यांनी प्रयत्न करीत म्हाडा (नगर व नाशिक) अधिकारी व उपनिबंधक सहकारी संस्था, नगर तालुका यांच्या माध्यमातून यशश्री गृहनिम र्ाण सहकारी संस्था स्थापन करून संस्थेचे रजिस्ट्रेशन केले. 2012 साली लावलेले हे यशश्री नावाचे इवलेसे रोपटे दरवर्षी हळूहळू वाढू लागले. आज 8 वर्षांत या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले असून, त्यावर 12 घरटी सुखाने, गुण्यागोविंदाने व एकमेकांच्या सुख-दुः खात आपुलकीने, प्रेमाने सहभागी वास्तव्य करीत आहेत. नुकतेच 12 फ्लॅटधारकांच्या म्हाडा बिल्डिंग सुशोभीकरण व नूतनीकरणाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मनपा सभागृहनेते मनोज दुलम, नगरसेविका सोनाबाई शिंदे, श्रीमती आशाताई कराळे उपस्थित होत्या. आ. संग्राम जगताप उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी कार्यक्रमास दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सोसायटीच्या सुशोभीकरण व नूतनीकरण काम ात योगदान दिलेल्या मिस्तरी, लाईटमन, प्लंबर, फॅब्रिकेटर, इंजिनिअर, सीसीटीव्ही, रंगकाम कारागिर आदी सर्वांचे कौतुक करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सिव्हिल हडको परिसरातील मित्रपरिवार, वीज कंपनीतील निवृत्त अधिकारी गोकुळ बिडवे, सरकारी वकील योहान मकासरे, बाळासाहेब गायकवाड, अजय म्याना, दीपक गुंडू, सुमित इपलपल्ली, योगेश म्याकल, पद्मशाली युवा शक्ती, पद्मनाभम् ढोलपथक व दातरंगेमळा श्री सूर्यमुखी दत्तमंदिर प्रमुख विराज म्याना, नगर जल्लोष ट्रस्ट प्रमुख सागर बोगा उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचे यशश्री गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या.चे चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार व समस्त सभासदांनी स्वागत केले. योगेश ताटी यांनी सूत्रसंचालन केले.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा