कापड बाजार परिसरात तातडीने स्वच्छतागृहाची व्यवस्था व्हावी -शिवराष्ट्र सेनेचे व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विजय पितळे यांची मागणी

अहमदनगर- कापड बाजार परिसरात अनेक दुकाने आहेत, या दुकानात काम करणारे आणि दुकानात येणारे ग्राहक यामुळे नेहमीच कापड बाजार गजबजलेला असतो. परंतु या भागात मनपाचे एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने गैरसोय होत आहे, विशेषत: महिलांची मोठी कुचंबना होत असल्याने तातडीने या भागात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात यावे, अशी मागणी मनपा उपायुक्त प्रदीप पठारे यांच्याकडे शिवराष्ट्र सेनेच्या व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय पितळे यांनी केली आहे. याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, दलित आघाडीप्रमुख अनिल शेकटकर, ओबीसी आघाडी प्रमुख बाबासाहेब करपे, ज्येष्ठ पदाधिकारी भैरवनाथ खंडागळे, शहर जिल्हाध्यक्षा अक्षय कांबळे आदि उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कापड बाजार येथे नेहमीच गर्दी असते, त्याचप्रमाणे दिवाळी, ईद, नाताळ अशा सणांना तर मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी येत असतात. बाजारपेठेत स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने लांब जावे लागते. तरी मनपाने या ठिकाणी स्वच्छता गृहाची व्यवस्था करावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे. याप्रसंगी विष्णू बल्लाळ, निलेश आहुजा, सचिन पितळे, संतोष ठाकूर, अजय अपुर्वा, सचिन जामगांवकर, सतीश कुलकर्णी, राजू पितळे, अभय बोरा, हरिदास लखारा, राजू जोशी, हितेश शाह, रुपेश बोरा, विरेश गांधी आदि उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा