महानगरपालिकेच्या स्थायी समितीतून 8 सदस्य महिनाअखेरीस होणार निवृत्त

शिवसेनेचे 3, भाजप व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 व बसपाच्या एका सदस्याचा समावेश

अहमदनगर- नगर महापालिकेच्या स्थायी समितीचे 8 सदस्य 1 फेबुरवारीला निवृत्त होत असून यामध्ये शिवसेनेचे 3, भाजप व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 आणि बसपाच्या एका सदस्याचा समावेश आहे. या निवृत्त होणार्‍या सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी नगरसचिव एस.बी.तडवी यांनी महासभा बोलविण्याचा प्रस्ताव महापौर बाबासाहेब वाकळे यांना सादर केला आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेत पुन्हा राजकीय घडामोडी रंगणार असून स्थायी समिती वर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांची फिल्डिंग सुरु होणार आहे. निवृत्त होणार्‍या सदस्यांमध्ये बसपाचे मुद्दसर शेख, शिवसेनेचे सुभाष लोंढे, सुवर्णा जाधव, योगीराज गाडे, भाजपच्या सोनाली चितळे, आशा कराळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कुमार वाकळे, गणेश भोसले या नगरसेवकांचा समावेश आहे. यात सर्वाधिक 3 सदस्य शिवसेनेचे असून भाजप व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 व बसपाचा एक सदस्य निवृत्त होणार आहे. सदस्य निवडीच्या सभेत संबंधित पक्षाच्या गटनेत्यांकडून शिफारस होणार्‍या नावांवर महापौरांकडून शिक्कामोर्तब केले जाते. त्यामुळे आता संबंधितांनी आपापल्या पक्षाकडे मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा