महागाई भत्त्याची थकबाकी मिळण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी

अहमदनगर- पाच महिन्यांच्या कालावधीत महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने मिळण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना देण्यात आली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली. 1 जुलै 2019 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याची दर बारा टक्के वरून सतरा टक्के करण्यात आला. सदर महागाई भत्तावाढ दि.1 डिसेंबर 2019 पासून रोखीने देण्यात आली. तसेच दि.1 जुलै 2019 ते 30 नोव्हेंबर 2019 या पाच महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी बाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील असे शासनाने मागील शासन आदेशाद्वारे घोषित केले होते. परंतु घोषित केल्याप्रमाणे शासनादेश अद्यापि निर्गमित करण्यात आलेला नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. दि.1 जुलै 2019 ते 30 नोव्हेंबर 2019 या पाच महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने देण्यासाठी शासन निर्णय त्वरीत निर्गमित करण्याच्या मागणीसाठी शिक्षक परिषद आग्रही असल्याचे शिक्षक परिषदचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी म्हंटले आहे. हा शासन निर्णय निर्गमीत होण्यासाठी बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल सर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, देवकर सर, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, उकीर्डे सर, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, थोरे सर, प्रदीप बोरूडे, युनूस शेख, ईकबाल काकर आदि प्रयत्नशील आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा