दिव्यांग वकिलांसाठी नोटरी पदासाठीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी-प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाची मागणी

अहमदनगर- दिव्यांग वकिलांसाठी विधी व न्याय विभागात नोटरी पदासाठी 4 टक्के आरक्षणाची तरतूद आहे. त्या तरतुदीनुसार अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी बच्चू कडूप्रणित प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्यावतीने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.लक्ष्मणराव पोकळे यांनी केंद्रीय कायदा मंत्री व सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

केंद्रीय कायदा मंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांग अधिनियम 2016 नुसार भारतामधील दिव्यांग व्यक्तीसाठी 4 टक्के आरक्षण लागू झालेले असून, त्याचप्रमाणे दिव्यांग वकिलांसाठी विधी विभागात आजपावेतो आरक्षण लागू झालेली नाही. म्हणून दिव्यांग वकिलांसाठी नोटरी पदासाठी 4 टक्के आरक्षण तातडीने लागू करावे. नोटरी अधिनियम 1952 केंद्र सरकार अधिनियम आहे व नोटरी नियम 1956 हे सुद्धा केंद्र सरकारद्वारा जारी नियम आहे. यामध्ये संशोधन केंद्र सरकारकडूनच होते. सदर नोटरी पद हे दिव्यांगासाठी सोयीस्कर असून त्यांना बसल्या ठिकाणी काम करणे सोपे जाईल. व त्यांची उपजिविका व्यवस्थीतरित्या पार पाडू शकतो. या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन दिव्यांग अधिनियम 2016 च्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन दिव्यांग वकिलांसाठी 4 टक्के नोटरी पदासाठीचे आरक्षण द्यावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा