हातात झाडू घेत आ.संग्राम जगताप यांनी नगरकरांना दिला स्वच्छतेचा संदेश

(छाया – लहू दळवी)

अहमदनगर- राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आ.संग्राम जगताप यांनी नगरकरांना स्वच्छतेचा संदेश देत वस्तु संग्रहालय येथे हातात झाडू घेवून परिसरामध्ये स्वच्छता मोहिम राबविली. यावेळी आ.संग्राम जगताप म्हणाले की, प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी स्वच्छतेची गरज असते. प्रत्येक नागरिकांनी आपली कॉलनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मनपाला सहकार्य करावे प्रत्येकाने आठवडयातून एकदा सकारात्मक दृष्टिकोनातून स्वच्छता मोहिमेत भाग घेवून आपले कर्तव्य पार पाडावे. केंद्र व राज्य सरकारच्या भारत स्वच्छ अभियान व माझी वसुंधरा हे अभियान शहरामध्ये सुरू असून प्रत्येकाने जबाबदारीने स्वच्छता राखावी. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना संस्काराचे धडे देवून छत्रपतींना घडविले. यासाठी प्रत्येकाने राजमाता जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजामध्ये काम करावे. स्वामी विवेकानंदाचे विचार आजच्या युवकांना प्रेरणादायी आहे. आपल्या देशामध्ये युवकांची संख्या मोठया प्रमाणात असून युवकांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. प्रत्येकाने स्वामी विवेकानंदाचे विचार अंगीकारावे. भविष्य काळात भारत देश हा महासत्ता होण्यासाठी युवकांची खरी गरज आहे. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये अनुभव मिळत असतो तोच अनुभव आपल्याला शिकवत असतो. जो पर्यत जिवन आहे तोपर्यत शिकत राहा, असे ते यावेळी म्हणाले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा