युडीसीआर नियमावलीची प्रत सभासदांना देणार-अध्यक्ष सलिम शेख

अहमदनगर- राज्य शासनाने डिसेंबरमध्ये बांधकाम व्यवसायाशी संबंधीत नवीन युडीसीआर नियमावली जाहिर केली असून याची प्रत लवकरच संघटनेच्या सर्व सभासदांना देण्यात असल्याचे असो. चे अध्यक्ष सलिम शेख यांनी सांगितले. आर्किटेक्ट इंजिनिअर्स अ‍ॅण्ड सव्हेअर्स असोसिएशनच्या दरवर्षी प्रकाशीत होणार्‍या दैनंदिनीचे प्रकाशन नुकतेच झाले. त्यावेळी श्री. शेख बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या दैनंदिनीमध्ये बांधकाम व्यावसायिकांना दैनंदीन कामकाजात उपयोगी पडणार्‍या माहीतीचा समावेश असल्याने ती अतिशय उपयुक्त आहे. ही दैनंदिनी निर्मितीसाठी राजूरी स्टील कंपनीचे प्रायोजकत्व लाभले आहे. राजुरी स्टीलचे अनुप खुळे म्हणाले की, नगरमधील बांधकाम व्यावसायिकांच्या असोसिएशनचे कार्य व उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासात बांधकाम व्यावसायिकांचे मोलाचे योगदान असते. त्यांच्या दैनंदिनी प्रकाशीत करण्याचा उपक्रम देखील उत्कृष्ट आहे. यावेळी सचिव आदिनाथ दहिफळे, सचिव प्रदीप तांदळे, अन्वर शेख, चेतन संचेती, इकबाल सय्यद, चंद्रशेखर जगताप, उपाध्यक्ष विजय पादीर, मिनल काळे, एकनाथ जोशी, भूषण पांडव, ईश्वर बोरा, अभिजीत देवी आदी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा