युवकांनी ध्येय प्राप्तीसाठी जागृक होण्याची गरज-अ‍ॅड. अनिता दिघे

अहमदनगर- युवकांनी ध्येय प्राप्तीसाठी जागृक होण्याची गरज आहे. मोबाईल व सोशल मिडीयात युवक आपला सुवर्ण क्षण वाया घालवत आहे. जागरुक व सक्षम युवक देशाची खरी शक्ती आहे. समाजपरिवर्तनासाठी युवकांचे सामाजिक उपक्रमात योगदान महत्त्वाचे आहे. युवकांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेतल्यास परिवर्तन निश्चित असल्याची भावना अ‍ॅड. अनिता दिघे यांनी व्यक्त केली. नेहरू युवा केंद्र व आधारवड बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्यावतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी अ‍ॅड. दिघे बोलत होत्या. या राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन वृक्षारोपण व स्वच्छता अभियानाने करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, अहमदनगर शहर बार असो.चे अ‍ॅड. सुनील तोडकर, रयत प्रतिष्ठानचे पोपटराव बनकर, उडान फाउंडेशनच्या आरती शिंदे, किरण फाऊंडेशनच्या किरण सातपुते, द युनिव्हर्सल फाऊंडेशनचे सागर अलचेट्टी, आदिती उंडे, माहेर फाऊंडेशनच्या रजनीताई ताठे, उत्कर्ष संस्थेच्या नयना बनकर, सिमोन बनकर, मोहन ठोंबे, सुनील डहाळे आदी उपस्थित होते. प्रारंभी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले.

अ‍ॅड. भानुदास होले यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे, या उक्तीप्रमाणे प्रत्येक वृक्षाची, रोपाची काळजी प्रत्येकाने स्वतःहून घेतली पाहिजे. मानवाला जगण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन वृक्षापासूनच मिळतो. मानवाच्या अस्तित्वासाठी वृक्ष संगोपन ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. बहुजन चळवळीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन ठोंबे यांनी निरोगी आयुष्यासाठी स्वच्छता ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असून, सार्वजनिक स्वच्छतेसाठी प्रत्येकाने काळजी घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत चांदबीबी महाल परिसरात स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण करण्यात आले. तसेच या सप्ताहातंर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवून कोरोना महाम ारीच्या बचावासाठी जनजागृती केली जाणार आहे. या राष्ट्रीय युवा सप्ताहासाठी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, लेखापाल सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा