‘नगर अर्बन’ची सिन्नर शाखा 31 मार्चपासून होणार बंद

अहमदनगर- नगर अर्बन को-ऑप. मल्टीस्टेट बँकेच्या चाकण (जि.पुणे) येथील शाखेपाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शाखाही 31 मार्चपासून बंद करण्यात येणार आहे, तशी पब्लिक नोटीस बँकेने जारी केली आहे. नगर अर्बन बँकेच्या राज्यभरात विविध ठिकाणी शाखा आहेत. त्यापैकीच चाकण (जि. पुणे) येथे सुरू असलेली शाखा बंद करण्याची नोटिस बँकेने दोन दिवसांपूर्वी जारी केली होती. आता त्या पाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शाखाही बंद करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. सदर शाखा 31 मार्चपासून बंद करण्यात येणार आहे. सदर शाखेतील सर्व खातेदार, ठेवीदार आणि त्यांचे व्यवहार नाशिक शाखेत वर्ग करण्यात येणार आहेत. त्याबाबत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी पब्लिक नोटीस जारी केली आहे. बँकेच्या काही शाखांमध्ये अपेक्षित व्यवहार होत नसल्याने त्या तोट्यात चालवल्या जात आहेत. खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने तोट्यातील शाखा बंद करण्याचे धोरण बँकेने घेतले असल्याचे समजते. त्यामुळे चाकण, सिन्नरसह आणखी काही शाखा लवकरच बंद केल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा