रात्रीच्या वेळी रस्तालूट करणार्‍या दरोडेखोरांची टोळी पकडली

(छाया – बबलू शेख,नगर)

अहमदनगर- रात्रीच्या वेळी शस्त्राचा धाक दाखवून वाहन चालकांना लुटणारी टोळी तोफखाना पोलिसांनी पकडली आहे. या टोळीने बाह्यवळण रस्त्यावरील दोन आणि पाईपलाईन रोडवरील एका रस्तालुटीची कबुली दिली असून त्यांच्याकडून लुटीतील 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहरा बाहेरील बाह्यवळण रस्त्यावर दोन दिवसापुर्वी रात्रीच्या वेळी दोन मालट्रक चालकांना लुटण्यात आले होते. तसेच एक इंडिगो कारही चोरट्यात आली होती. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. याचा तपास करत असताना तोफखाना पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अधिकारीकर्मचारी हे कल्याण रोड, बोल्हेगाव व एमआयडीसी परिसरात दरोडेखोरांचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा पाच जणांच्या टोळीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी अक्षय भिमा गाडे (वय 23, रा.मुदगल वाडा, शिवाजीनगर, कल्याण रोड), विश्वास नामदेव गायकवाड (वय 21, रा.श्री टाईल्स् चौक, एमआयडीसी), निलेश बाळासाहेब कारले (वय 22, रा.गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता रोड), निलेश संजय शिंदे (21, रा.तांबटकर मळा, हॉटेल संकल्प जवळ), अमोल बाबूराव कणसे (वय 25, रा.जय भवानी चौक, गणराज कॉलनी, गांधीनगर, बोल्हेगाव) या पाच जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेवून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता तसेच त्यांना पोलिसी खाक्या दाखविला असता त्यांनी सदर गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच पाईपलाईन रोडवर हॉटेल प्रियदर्शनी समोर शुक्रवारी (दि.8) दोन व्यक्तींना कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याचीही कबुली दिली. या टोळीकडून त्यांनी लुटमारीत पळविलेला 3 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीकडून आणखीही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता असल्याने साहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे याबाबत अधिक तपास करीत आहेत. सदरची कारवाई शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे, तोफखान्याचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके, हे. कॉ. जपे, अविनाश वाकचौरे, वसिम पठाण, अहमद इनामदार, धीरज अभंग, दत्तात्रय कोतकर, सचिन जगताप, शिरीष तरटे, धिरज खंडागळे, शैलेश गोमसाळे, महेश दातार,साबिर शेख
आदींच्या पथकाने केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा