पेट्रोल, डिझेल पाठोपाठ जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीने जनता झाली हैराण

तेल, शेंगदाणा, तांदळाच्या दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले 

अहमदनगर- पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी पाठोपाठ आता जीवनावश्यक वस्तूंच्या भावातही कमालीची वाढ झाली असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. या महागाईच्या काळात घर कसे चालवायचे असा यक्ष प्रश्न सामान्य नागरिकांसमोर उभा राहिला आहे. सध्या भाजीपाल्याचे बाजारभाव गडगडले असतानाच किराणा मालाचे दर मात्र कमालीचे वाढले आहेत. दैनंदिन जीवनात स्वयंपाकघरात लागणार्‍या तेल, शेंगदाणा, शाबुदाणा, तांदूळ यासह विविध वस्तूंचे भाव कडाडले आहेत. या महागाईच्या संकटात साखरेचे भाव मात्र कमी झाले आहेत हीच एक सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बाब ठरत आहे. खाद्यतेलाच्या किंमतीने उच्चांक गाठला असून, जे तेल 130 रुपये कि./ लि. मिळत होते तेच सध्या 155 ते 160 रुपयाप्रमाणे खरेदी करावे लागत आहे. शेंगदाणे, शाबुदाणा, तांदूळ या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ होत असल्याने गृहिणींच्या बजेटवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. महागाईने डोके वर काढल्याने सामान्य जनतेला काटकसरीचा मार्ग अवलंबावा लागत आहे. पेट्रोल-डिझेलने आधीच कंबरडे मोडलेल्या सामान्य माणसाला जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीलाही सध्या सामोरे जावे लागत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा