प्रेरणादाई अक्षरधन-‘नाना’ तर्‍हा ‘नाना’कळा नाना पाटेकर

तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्यपणे वागणारा. माणुसकीचा गहिवर असलेला असामान्य कलावंत. जे. के. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये शिक्षणानंतर अ‍ॅडव्हर्यायझिंग कंपनीत आणि तत्कालीन परिस्थितीत गरजेनुसार काम करणारा. सिनेमात नावलौकिक मिळवले तरी नाट्यमंचावर प्रेम असणारा. आतून- मनातला, रोखठोक बोलणारा नाना बर्‍याच लोकांना विक्षिप्त, सनकी वाटतो. मनस्वीपणा हा गुण तापदायक ठरला तरी त्याला जे म्हणायचे तेच तो म्हणतो. आई – हा नानाचा वीक पॉईंट. बर्‍याचदा बोलतांना त्यानं सांगितलंय, मी आईच्या घरात राहतो ती माझ्या घरात नाही. ‘प्रहार’चा खास राष्ट्रपतींसाठी शो झाला तेव्हा त्याने आईला बरोबर नेले होते. ‘नाम’ नंतर तो लोकांना माहित झाला असला तरी पूर्वीपासून समाजासाठी तो करत आलाय. त्याच्याच भाषेत सांगायचं तर, “ओंजळीतून खाली पडण्याच्या आत जे असेल ते वाटून टाकावं. ओंजळभर ठेवावं.”

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा