व्हीआरडीईच काय कोणताही प्रकल्प महाराष्ट्र राज्याबाहेर जावू देणार नाही-खा.डॉ.श्रीकांत शिंदे

अहमदनगर – नगरमधील व्हीआरडीई स्थलांतराच्या प्रयत्नाबाबत येथील अधिकारी व कर्मचार्‍यांनी केंद्रीय संरक्षण समितीचे सदस्य खासदार श्रीकांत शिंदे यांची ठाणे येथे भेट घेऊन स्थलांतर थांबवावे, अशी विनंती नगरमधील व्हीआरडीई बचाओ आंदोलनाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन केली. यावेळी दुर्गेश गाडेकर, एम.जाधव, पी.जी.गवळी, के.बी. करोसिया आदि उपस्थित होते. सदर निवेदन मंत्री एकनाथ शिंदे यांनाही देण्यात आले.

यावेळी खा.श्रीकांत शिंदे यांनी नगरच्या व्हीआरडीई संदर्भात माहिती घेऊन स्थलांतराबाबत आपण केंद्रीय संरक्षण समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करुन हे स्थलांतर थांबविण्यासाठी प्रयत्न करु. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत लक्ष घालण्यास सांगून खा.संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे सर्व खासदार संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करु, असे आश्वासन दिले.

हा प्रश्न नगरचा नसून, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने महाराष्ट्रातील कोणताही प्रकल्प राज्यबाहेर जाऊ देणार नाही. या संदर्भात लवकरच दिल्ली येथे सर्वपातळ्यांवर प्रयत्न करणार असल्याचे खा.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले याबाबत नगरमध्ये शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांना निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी खा.श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधून व्हीआरडीई स्थलांतराबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी ठाणे येथे शिष्टमंडळास येण्यास सांगितले होते, त्या अनुषंगाने काल ठाणे येथे शिष्टमंडळाने खा.श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा