व्हीआरडीई बंद होणार असल्याने असंख्य कुटुंबे होणार उद्ध्वस्त-शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

अहमदनगर – संपूर्ण भारतात नगरचे नाव व्हीआरडीईमुळे परिचित आहे. परंतु आता हि संस्था नगरमधील आपले युनिट बंद करून दुसर्‍या राज्यात स्थलांतरित होत आहे.त्यामुळे या संस्थेवर अवलंबून असलेली 2000 कुटूंबे उध्वस्त होणार आहे. तसेच याचा बाजारपेठ व अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. तरी याबाबत आपण स्वतः लक्ष घालून केंद्र सरकार च्या संरक्षण खात्याशी संपर्क साधून ही संस्था या ठिकाणाहून जाऊ नये, यासाठी मार्ग काढण्यात यावा, असे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात येऊन जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा करण्यात आली. यावेळी माजी शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संजय शेंडगे, दत्ता कावरे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, शाम नळकांडे, विजय पठारे, दत्ता जाधव, संतोष गेनाप्पा, संग्राम कोतकर, मुना भिगारदिवे, संतोष तनपुरे, बापूसाहेब बनकर, अनिल निकम, विशाल गायकवाड, स्वप्नील ठोसर, अक्षय नागपुरे आदी उपस्थित होते. केंद्र सरकारने जो स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे, तो मागे घेण्यात यावा व हजारो कुटूंबे उध्वस्त होण्यापासून वाचवण्यात यावित, हि मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले कि, या विषयावर लवकरच एक बैठक घेण्यात येईल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा