आपली छोटीशी मदतही मोलाची ठरते-जितेंद्र पलिकुंडवार

अहमदनगर- आपल्या कामातून समाजासाठी योगदान देता येत असते. इतरांनाचाही भावना सम जून घेतल्यास अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकते. आपली छोटीशी मदतही समोरच्यासाठी मोलाची ठरत असते. अशाप्रकारे सर्वांना मदत करणारे नरेंद्र मेरगु हे अनेकांचे रुग्णमित्र बनले आहेत. डॉ.पाटणकर लॅबोरेटरीच्या माध्यमातून मित्र परिवार व रुग्णांना दिलासा देण्याचे काम ते करतात.

अनेक मित्रपरिवाराच्या माध्यमातून रक्तदान चळवळी त्यांचे मोठे योगदान आहे. त्याचे हे कार्य असेच अखंड सुरु राहण्यासाठी आम्ही सर्व त्यांच्याबरोबर राहू, असे प्रतिपादन अष्टविनायक ब्लॅड बँकेचे प्रशासकीय अधिकारी जितेंद्र पलिकुंडवार यांनी केले. डॉ.पाटणकर लॅबोरेटरीचे व्यवस्थापक नरेंद्र मेरगु यांचा मित्र परिवाराच्यावतीने वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जितेंद्र पलिकुंडवार, एलआयसी प्रतिनिधी संतोष जाधव, गणेश भागानगरे, वैद्यकीय विमा प्रतिनिधी प्रशांत निमसे, राजेंद्र जोग, संदिप दिवटे, हरिष लंगोटे, आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी नरेंद्र मेरगु यांच्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा