शासन नियमांचे उल्लंघन करणार्‍या आरटीओला सेवेतून निलंबित करा-जिल्हाधिकारी यांना निवेदन

अहमदनगर- खरं तर कायद्याचा धाक दाखवून वाहनचालकांकडून चुकीबद्दल दंड गोळा करतात यासाठी सामान्यांनाही वेठीस धरले जाते पण, स्वत: विनाक्रमांक असलेले व अधिकृत नोंदणी न केलेले वाहन वापरुन अपघाताला निमंत्रण देतात अशा अधिकार्‍यांविरोधात कारवाई व्हावी व मुंबई सेक्शन अ‍ॅक्टच्या कलम 49 व 42 नुसार गुन्हा दाखल करुन त्यांना सेवेतूनच मुक्त करावे, अशी मागणी शेख अजीम, खान फिरोज, अंजर खान आदींनी केली. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर सरफराज जहागिरदार, शाह फैसल(शानु), वाहिद शेख, शरिफ सय्यद आणि शहेबाज बॉक्सर, शहेबाज खान यांच्या सह्या आहेत.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, येथील डेप्युटी आर.टी.ओ दीपक पाटील यांच्या टाटा हेरियर चारचाकी वाहनाने भिस्तबाग चौक येथे 3 दिवसांपूर्वी एका टू व्हीलर वाहनाला धडक दिली. त्यामध्ये टू व्हीलरवरील व्यक्तीला किरकोळ मार लागला. त्यावेळी सदरील व्यक्ती व आर.टी.ओ यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर एका स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने वादावर पडदा टाकत विषय पोलीस स्टेशनला संपवण्यात आला. मात्र, वाहन परवाना, वाहन चालक परवाना आदि नियमांची अंमलबजावणी करणारा आर.टी.ओ. अधिकारी विनाक्रमांकाच्या वाहनाचा वापर करुन स्वत:च शासन नियम मोडून वावरत आहे. अपघातामुळे त्यांचे हे गैरवर्तन अपघाताचा गुन्हा केल्याने सिध्द झाले. हा प्रकार संताप व्यक्त करणारा आहे. अपघातस्थळी लोकांच्या भावना तीव्र होत्या.

शहराला वाहतुकीची शिस्त लावणार्‍या अधिकार्‍याकडून जे घडले त्याची दखल घेऊन कारवाई झाली तर असे प्रकार पुन्हा घडणार नाही आर.टी.ओ.च्या चारचाकी वाहनास कोणताही नंबर नव्हता. त्या वाहनाचे कोणत्याही प्रकारे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले नाही असे निदर्शनास आले. ते चारचाकी वाहन मागील चार महिन्यांपासून विनानंबर मिरवत आहे. एका प्रथम वर्ग अधिकार्‍याने अशा प्रकारे नियमबाह्य कारभार करणे योग्य आहे का? तरी याविषयामध्ये आपण जातीने लक्ष घालून वरील अधिकार्‍यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा