शाळेची इतर वाढीव फी कमी करण्याचे शिक्षण अधिकार्‍यांचे खाजगी शाळांना आदेश

अहमदनगर- कोरोना काळातील सन 2020- 2021 या वर्षा अंतर्गत इयत्ता 3 री ते पुढील सर्व शिक्षण हे विद्यार्थी शाळेत न बोलावता ऑनलाईन शिक्षण शाळांनी द्यावे असे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्या अनुषंगाने शिक्षण देण्यास सुरुवात झाली. हे सर्व सुरु झाल्यावर शाळांनी फीचा तगादा लावण्यास पालकांना सुरुवात केली. यासंबधी मनसेच्यावतीने वेळोवेळी पाठपुरवठा करुन लॉकडाऊनमध्ये अनेकांचे काम, धंदा, व्यवसाय बंद असल्यामुळे अनेक पालक अडचणीत आले होते. अनेकांच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण शाळेची फी भरली नाही म्हणुन बंद केले. त्यामुळे अनेक पालकांनी सर्व शाळांना इतर सर्व फी माफ कराव्यात अशी मागणी केली परंतु शाळांनी संपुर्ण फी भरण्याचा तगादा चालूच ठेवला. त्यानंतर पालकांनी व मनसेच्यावतीने 28 डिसेंबर 2020 रोजी लॉकडाऊन काळात शाळा बंद असतांना ज्या गोष्टी विद्यार्थ्यांनी वापरल्याच नाही त्यातील कॉम्प्युटर फी, ग्रंथालय फी, बस फी, स्टेशनरी फी तसेच इतर फी माफ करुन फक्त शिकवणी फी घ्यावी, अशी मागणी मनसेने केल्यानंतर शिक्षण अधिकारी यांनी सर्व मागण्या मान्य करुन जिल्ह्यातील सर्व खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पत्र पाठवुन ज्या माध्यमांचा, गोष्टींचा विद्यार्थ्यांनी वापर केला नाही अशी सर्व फी पालक शिक्षक संघाच्या शाळेतील कमेटीत ठराव करुन फक्त शिकवणी फी एक, दोन, किंवा तीन टप्प्यात सर्व शाळांनी फी भरुन घ्यावी. तसेच फीची अडवणूक करुन कुठल्याही प्रकारे ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांचे बंद करू नये. तसेच 10 वीच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे थांबवू नये, असे आदेश दिनांक 4 जानेवारी 2021 रोजी शिक्षण अधिकारी रामदास हराळ यांनी जिल्ह्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांना दिले. त्याचे पत्र मनसेच्या नितीन भुतारे यांना सुध्दा दिले आहे. तसेच कोणालाही याविषयी खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी कुठल्याही प्रकारे विद्यार्थी व पालकांची अडवणुक केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, महिला जिल्हा अध्यक्षा अ‍ॅड. अनिता दिघे, उपजिल्हाध्यक्ष मनोज राऊत तसेच शहरातील मनसेच्या सर्व उपशहराध्यक्ष यांच्याशी बरोबर संपर्क साधुन शिक्षण अधिकारी यांचे आदेशाचे पत्र घेऊन जावे, असे आवाहन मनसेच्या नितीन भुतारे यांनी केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा