वाकळे स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीमुळे नगरच्या वैभवात आणखी भर-महापौर बाबासाहेब वाकळे

(छाया -अनिल शाह)

अहमदनगर- प्रत्येकाने आपल्या आयुष्यात रोज किमान एक तास तरी व्यायामासाठी काढावा. जेणेकरून आपले आयुष्य या माध्यमातून आनंददायी व अधिकाधिक मौल्यवान होण्यास मदत होईल, असे भावपूर्ण उद्गार महापौर बाबासाहेब वाकळे यांनी काढले. नगरच्या बालिकाश्रम रोडवर एल टी रिक्रिएशन क्लबजवळ व पूर्णा हॉटेलसमोर अद्यावत अश्या चार बॅडमिंटनसाठी अद्यावत होवा कोर्टची संदीप व सतीश दत्तात्रय वाकळे पा.

या भावंडांनी निर्मिती केली असून, कोर्टवर खाली 8 एम. एम.चे रबर मॅट अंथरण्यात आले असून त्यावर 4 एम.एम चे होवाचे आवरण देण्यात आले आहे. राज्य व राष्ट्रीय स्पर्धेसाठी असे कोर्ट वापरण्यात येते. संचालक संदीप व सतीश यांच्या मातोश्री सुम नताई दत्तात्रय वाकळे यांच्या हस्ते विधिवत औपचारिक कोर्टाची पूजा करण्यात आली. याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते पहिला नारळ वाढवून हे कोर्ट खेळाडूंसाठी खुले करण्यात आले.

यावेळी बॅडमिंटनचे प्रशिक्षक विजय पवार सर, सौ. शीतलताई वाकळे, शिवाजीराव डोके, रामानंद राय, धीरज सिंग, श्रीकांत सावंत, विकास आंब्रे, संदीप पिंपरकर, राहुल मोटे, विकास मोटे, किरण बोरूडे, राहुल गांधी, राहुल, महेश, सुरज वाकळे व खेळाडू उपस्थित होते. विषेशतः सावेडी येथील क्रीडाप्रेमींसाठी हे संकुल जवळ असून अतिशय अद्यावत देखील आहे. संदीप व सतीश वाकळे यांनी या कोर्टविषयी माहिती देतांना सांगितले की, हे कोर्ट नवोदित व प्रोफेशनल खेळाडूंसाठी उपलब्ध ठेवण्यात आले असून, दिवसभर खेळासाठी लागणार्‍या सर्व सोयी-सुविधा, येथे उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. उदयोन्मुख खेळाडूंसाठी ज्यांना येथे बॅडमिंटनचे प्रशिक्षण हवे असेल त्यांच्यासाठी रोज दुपारी चारनंतर प्रशिक्षक विजय पवार सराव घेणार असून, इच्छुकांनी मो.नं.9823234039 वर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

याव्यतिरिक्त या कोर्टच्या शेजारीच जिमचे काम पूर्णत्वास आले असून लवकरच क्रीडा प्रेमींसाठी ते सुरु होईल. या व्यतिरिक्त भविष्यात फुटबॉल, स्केटींग रींग, हॉलीबॉल खेळ या परिसरात सुरु करण्यात येणार आहे. क्रिकेटसाठी टर्फ विकेटची निर्मिती करण्यात येत आहे अशी माहिती दिली व आमच्या या स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीला खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. विजय पवार यांनी आभार मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा