मटार पुलाव

साहित्य –

  1. अर्धा किलो हिरवे वाटाणे
  2. तीन कांदे , चार टोमाटो
  3. दोन वाटया बासमती तांदूळ
  4. चार वाटया गरम पाणी
  5. तीन टेबल स्पून तेल
  6. दोन हिरव्या मिरच्या
  7. एक टेबल स्पून आले-लसूण पेस्ट
  8. पाव चमचा हळद , अर्धा चमचा तिखट
  9. पाऊण चमचा गरम मसाला पावडर
  10. चवीनुसार मीठ .

कृती –

  1. तांदूळ धुवून अर्धा तास भिजत ठेवावे .  कढाईत तूप तापले की मिरचीचे तुकडे टाकून कांदा टाकून परतावे .
  2. कांदा जरा नरम झाला की वाटाणे टाकावे .  टोमाटो टाकून परतावे .  आले-लसूण पेस्ट टाकून जरासे परतावे .
  3. तांदूळ टाकून हळद, तिखट मसाला , मीठ टाकून थोडा वेळ परतून गरम पाणी टाकून ढवळावे , मंद आचेवर शिजवावे .
  4. तांदळाप्रमाणे पाणी कमी किंवा जास्त टाकावे .  भात मोकळा झाला पाहिजे .
  5. आधी थोडे पाणी कमी टाकावे म्हणजे पाणी आणखी लागले तर थोडे पाणी टाकून वाफ काढता येते .  तुपाऐवजी तेल वापरले तरी चालते .
  6. भातावर खोबरे व कोथिंबीर टाकावी .  कुकरमध्ये एका शिट्टीत भात होतो .  भाज्यांसाठी , भातासाठी लहान कुकर सोयीस्कर असतो .

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा