आयुर्वेदिक गर्भसंस्कार

आयुर्वेदामध्ये बालकाच्या आरोग्याचा विचार अतिशय सूक्ष्म पद्धतीने केलेला आहे. बालकाची शारीरिक व मानसिक वाढ चांगली व्हावी, बालकाचे आरोग्य चांगले राहावे तसेच त्याची आजारांविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असणारी रोगप्रतिकारकशक्ती वाढावी याकरिता काही औषधी द्रव्यांपासून बनविलेली बालगुटी बालकास द्यावयास सांगितली आहे. ही औषधी द्रव्ये सहाणेवर दूधासोबत उगाळून त्याची होणारी पेस्ट बाळाला चाटवावी. त्यासाठी मातेच्या दुधाचा किंवा गायीच्या दुधाचा वापर करावा. मातेचे किंवा गायीचे दूध 2-3 चमचे घेऊन त्यात या औषधी द्रव्यांचे वेढे सहाणेवर उगाळून गुटी बनवावी.

औषधीद्रव्ये : खारीक, बदाम, जायफळ, मायफळ, ज्येष्ठमध, हिरडा, बेहडा, बालहिरडा, मुरुडशेंग, अतिविषा, डिकामली चूर्ण, वेखंड, खडीसाखर. 1. खारीक, बदाम : ही द्रव्ये धातुवर्धक, बल्य अशी आहेत; म्हणून बाळाचे वजन चांगले वाढावे, बाळ सुदृढ व्हावे यासाठी याचा उपयोग होतो. खारीक व बदाम ही द्रव्ये चवीला गोड असल्याने हीचे वेढे थोडे जास्त घ्यावेत. 2. जायफळ : हे दिसायला बेहड्यासारखे फळ असून पांढरट रंगाचे असते. जेव्हा बाळाला जुलाब होतात, तेव्हा याच्या ग्राही गुणधर्मामुळे जुलाब थांबतात. तसेच याने बाळाला झोप देखील शांत येते. गुटीमध्ये जायफळाचा वापर विचारपूर्वक करावा. बाळाला जास्त झोप येत असेल, तर एखादाच वेढा घ्यावा. झोपेचे प्रमाण कमी असेल, तर 2-3 वेढे घ्यावेत. तसेच संडास कडक होत असेल, तर याचे प्रमाण कमी ठेवावे व बाळाला जुलाब होत असतील, तर तेवढ्यापुरते प्रमाण वाढवावे. 3. मायफळ : हे बेहड्याच्या आकाराचे, पण छोटे, गोलसर फळ आहे. यावर काट्यासारखे छोटे छोटे फोड असतात. हे शीत गुणात्मक असल्याकारणाने बाळाला तोंड येणे, लघवी गरम होणे, अंग गरम लागणे अशा लक्षणांवर आपल्याला याचा वापर करता येतो; यामुळे बाळाची वाढदेखील चांगली होते; म्हणून नियमितपणे गुटीमध्ये याचा वापर करावा. 4. ज्येष्ठमध : ज्येष्ठमधाची काडी वरून तांबूस रंगाची व आतून पिवळसर असते. ज्येष्ठमधाची चव गोड असते. हे रक्तवर्धक, कंठसुधारक व बलकारक असे आहे; त्यामुळे बाळाचा खोकला थांबतो, आवाज चांगला होतो व रक्ताचे प्रमाणदेखील व्यवस्थित राहून बाळ सुदृढ होते; म्हणून याचा गुटीत वापर करावा.

(क्रमश:) डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर अहमदनगर

मोबाईल नं- 8793400400

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा