धडकचा ट्रेलर पाहुन परश्या काय म्हणतो….

 

सध्या बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर त्यांच्या आगामी सिनेमा धडकचे जोरदार प्रमोशन करत आहे. धडक हा मराठी सुपरडुपर हिट सिनेमा सैराटचा हिंदी रिमेक आहे. त्यामुळे हीच कमाल हिंदीत ही होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीची धडकचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर त्याची गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

सिनेमा प्रदर्शनापूर्वीच सैराट फेम आकाश ठोसरने यावर प्रतिक्रीया दिली आहे. आकाश म्हणतो, मला सिनेमचा ट्रेलर प्रचंड आवडला आणि सिनेमा पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. मी जान्हवी-ईशानसाठी आनंदी आहे. आणि मला खात्री आहे त्या दोघांनीही उत्तम काम केलं असेल.

सैराट या मराठी सिनेमात आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत होते. दोघांनीही पर्दापणातच केलेल्या जबरदस्त अभिनयाने सैराटला एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा