आयुर्वेदिक गर्भसंस्कार

गर्भवती स्त्रीची जर पहिली खेप असेल, तर तिच्या मनात प्रसूतीबद्दल भीती, अनेक प्रकारच्या शंका असतात. मला प्रसूतीच्या वेदना, त्रास सहन होईल का, कोणत्या वेळी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होण्यासाठी जावे हे मला समजेल का? या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रसूतिअवस्था कशी असते; त्यात कोणती लक्षणे असतात याची माहिती खाली माहिती देत आहोत. प्रसूती होण्यापूर्वी खालीलप्रमाणे 1 किंवा 2 लक्षणे आढळतात. 1) अचानक योनीतून लाल-पिवळसर प्रवाही पदार्थ वाहू लागतो. 2) थोड्या थोड्या अंतराने ओटीपोटात दुखणे, साधारणतः थोड्या थोड्या अंतराने दुखते व परत थांबते. यालाच आपण कळा येणे असे म्हणतो. 3) योनीतून पांढर्‍या रंगाचे लघवीप्रमाणे एकदम पाणी जाणे यालाच वरमुठ (रापळेींळल षर्श्रीळव) फुटणे असे म्हणतात. वरील लक्षणे दिसली की, प्रसूतीची वेळ जवळ आली आहे असे समजून हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्हावे. प्रसूतिअवस्था सुरू होऊन बाळ गर्भाशय मुखातून बाहेर येऊन जन्म होण्यापर्यंत व बाळाची वार (झश्ररलशपींर) बाहेर पडेपर्यंत प्रसूतीच्या तीन अवस्था असतात. 1) प्रथम अवस्था : या अवस्थेत गर्भवती चालू-फिरू शकते. तिला कळ आल्यामुळे गर्भाशयाचा वरचा भाग आकुंचन पावतो. गर्भाशय मुखाजवळील शिरांवर दाब येतो. गर्भाशयाचा आकुंचन कालावधी दर 15 ते 20 मिनिटांचा असतो. गर्भाशयाचे मुख अंदाजे 3 सेंमी. इतके उघडते. प्रथम अवस्थेमध्ये दोन कळांच्यामध्ये मार्जरासन करावे: यामुळे गर्भाशयाचे तोंड उघडण्यास मदत होते. त्यानंतर दर 3-3 मिनिटांनी गर्भाशय आकुंचन पावण्याची क्रिया होते. या वेळी गर्भाशयाचे मुख 6 सेमीं. एवढे उघडते. काही वेळाने प्रथम अवस्थेच्या शेवटी कळा दर 2 मिनिटांनी येतात. प्रथम खेप असलेल्या गर्भवती स्त्रियांमध्ये पहिली अवस्था ही 12 ते 24 तास असू शकते, तर दुसरी वा तिसरी खेप असणार्‍या स्त्रियांमध्ये पहिली अवस्था ही कमी म्हणजे काही तासांपुरतीच असते. (क्रमश:) डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा