हरा चना सँडविच

साहित्य : ताजे ब्रेड स्लाईस 2, ओल्या सोललेल्या हरभर्‍याचे दाणे 2 चहाचे चमचे, बटर 2 चहाचे चमचे, आवडीनुसार मीठ, मिरपूर, लहान हिरवी मिरची अर्धी. कृती : प्रथम ओले हरभरे दाणे व लहान मिरची मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाट्यावर जाडसर वाटून घ्या. त्यात चवीपुरते मीठ व मिरपूड घाला. कालवून मिश्रण तयार करा. ब्रेडच्या स्लाईसला एका बाजूस सम प्रमाणात बटर लावा. त्यावर वरील मिश्रण सारखे पसरून घाला. ब्रेडच्या मिश्रण लावलेल्या बाजूस अलगद एकमेकींवर पालथ्या ठेवा. दाबा. तिरपे कापून खायला द्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा